शोभना देशमुख यांचा सत्कार

0
992

अलिबाग ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राची अस्तिता असलेल्या रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अंधारात असून हा परिसर प्रकाशमय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वरिष्ठ पातळीवर त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय़ रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत घेण्यात आला.
रायगड प्रेस क्लबची बैठक नुकतीच रायगड किल्लयावर झाली.यावेळी पत्रकारांनी किल्ल्याची पाहणी करून तेथील अडचणी स्थानिक जनतेकडून समजावून घेतल्या.वीज बिल न भरल्यामुळे नुकताच रायगडावरील विज पुरवठा खंडित केला गेला होता.,किल्लयावरील सोलर दिवेही बंद असल्याने किल्ल्यावर काळोख असतो याबद्दल स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत.याचा पाठपुरावा करून सारा रायगड विजेच्या झोताने प्रकाशमान करावा यासाठी आता जिल्हयातील पत्रकार प्रय़त्न करणार आहेत.
प्रेस क्लबच्या या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वार्ताहर शोभना देशमुख यांंंना आकाशवाणीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार कऱण्यात आला.उत्कृष्ट कामाबद्दल आकाशवाणीच्यावतीने शोभना देशमुख यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे.रायगड प्रेस क्लबच्या या कार्यक्रमास प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगडचे निमंत्रक दीपक शिंदे,तसेच जिल्हयातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here