वर्तमानपत्रांची संख्या वाढतेय..

    0
    801
    वर्तमानपत्रांची संख्या वाढतेय..
    नवी दिल्ली :
    इलेक्टॉनिक मिडिया आला तेव्हा अनेकांना वाटलं आता वर्तमानपत्रांची सद्दी संपली.असं झालं नाही.वर्तमानपत्रांचे वाचक तर वाढतच गेले पण नव्याने वर्तमानपत्र ,सुरू होणंही थांबलं नाही.त्यासाठी खालील आकडेवारी वाचली पाहिजे.
    जागतिक कल लक्षात घेऊन भारतातील इंग्लिश आणि प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मार्च 2013 ते मार्च 2015 या दोन वर्षांत वृत्तपत्र नोंदणीची संख्या 94 हजार 67 वरून 1 लाख 5 हजार 443 वर पोचली आहे. 
    रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर इन इंडिया (आरएनआय) या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात हा कल पोचला आहे. यामध्ये देशात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. 31 मार्च 2013 रोजी या राज्यात 14 हजार 336 वृत्तपत्रांची नोंदणी होती आणि एका वर्षांत ही संख्या 15 हजार 209 वर पोचली. उत्तर प्रदेशमधील ही वाढ कायम असून, मार्च 2015 पर्यंत ती 16 हजार 130 अशी झाली आहे.
    महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. मार्च 2013 मध्ये या राज्यात 12 हजार 466 वृत्तपत्रांची नोंद होती. ही संख्या एका वर्षात 13 हजार 375 आणि मार्च 2015 मध्ये 14 हजार 394 वर पोचली. या दोन राज्यांनंतर देशाची राजधानी दिल्लीचा नंबर लागतो. दिल्लीमध्ये 2013 मध्ये 11 हजार 410 वृत्तपत्रांची नोंदणी होती. मार्च 2015 मध्ये ती 12 हजार 177 वर पोचली. अन्य अनेक राज्यांप्रमाणेच आंध्र प्रदेशमध्येही वृत्तपत्रांची संख्या वाढलेली दिसून येते. 2013 मध्ये या राज्यात 5 हजार 575 वृत्तपत्रांची नोंदणी होती. या वर्षी 31 मार्चपर्यंत ती 6 हजार 215 वर गेली. नव्याने निर्मिती झालेल्या तेलंगण राज्यात 203 वृत्तपत्रांची नोंदणी आहे.
    मार्च 2014 मध्ये देशातील इंग्लिश वर्तमानपत्रांची संख्या 13 हजार 138 अशी होती. एका वर्षात ती 13 हजार 661 अशी झाली. याच कालावधीत हिंदी वर्तमानपत्रांची संख्या 40 हजार 159 वरून 42 हजार 493 झाली. मार्च 2014 मध्ये संस्कृत वर्तमानपत्रांची संख्या 80 होती. या वर्षी मार्चमध्ये ती 95 झाली.विक्रीतही मोठी वाढ
    वर्तमानपत्रांच्या खपातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हिंदी, इंग्लिश आणि उर्दु या भाषा वगळून 2011-12 मध्ये दररोज 10 कोटी 86 लाख 3 हजार 811 अंकांची विक्री होत होती. ती 2013-14 मध्ये 12 कोटी 51 लाख 19 हजार 648 वर पोचली. इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये 2011-12 मध्ये दररोज 68 कोटी 7 लाख 72 हजार 280 अंकांची विक्री होत होती. 2012-13 मध्ये त्यात घसरण झाली. मात्र, 2013-14 मध्ये दररोज विक्री होणाऱ्या अंकांच्या संख्येत थोडीसी सुधारणा झाली आहे(. दैनिक सकाळवरून साभार )

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here