रेल्वे अर्थसंकल्पात रायगडची उपेक्षाच

0
921

रेल्ने मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी परवा लोकसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा रायगड आणि एकूणच कोकणाच्या तोंडाला पानेच पुसल्याचे स्पष्ट झाल्याने रायगडात रेल्वे ंअर्थसंकल्पाबाबत जनतेते नाराजी आहे.
पेण ते अलिबाग या नव्या रेल्वे मार्गाला मान्यता मिळाल्याचे सांगितले जात असले तरी रेल्वे अर्थसंकल्पात मात्र या मार्गासाठी कोणतीही तरतूद असल्याचे दिसत नाही.कोकणकन्या,मांडवी तसचे जनशताब्दी एक्स्प्रेस या आणि अऩ्य काही गाड्या रायगडमधून जात असल्यातरी त्यााना रायगडात थांबे नसल्याने त्यांचा रायगडला उपयोग होत नाही.या लांब पल्ल्यांच्या गाड्‌य़ांना रायगडात थांबे देण्याबाबतही कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात नाही.सीएसटी ते पेण अशी लोकल सोडण्याची मागणीही रायगडवासिय गेली अनेक वर्षे करीत असले तरी त्याबाबतही कोणतीच तरतूद नाही
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतुकीत गेल्या पाच वर्षात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे .या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण नेहमीच फुल्ल असते त्यामुळे आणखी किमान दोन गाड्या या मार्गावर सोडाव्यात अशी मागणी असतानाही केवळ मुंबई-करमाळी ही एक मेव गाडी सुरू केली जाणार आहे.निजामुद्दीन -मडगाव आणि निजामुद्दीन -त्रिवेंद्रम या गाड्या कोकणातील केवळ एक-दोन स्थानकावरच थांबणार असल्याने त्यांचा कोकणसाठी काहीच उपयोग नसल्याचे कोकणवासियांचे म्हणणे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here