रायगड जिल्हा वार्तापत्र

0
936

1) रायगडमध्ये आज मतदान  2) रायगडमध्ये स्टार प्रचारकांची हजेरी  3) ़मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा 4) आरोप-प्रत्यारोपांच्या रणधुमाळीत रायगडचे प्रश्न उपेक्षितच

 रायगड लोकसभा मतदार संघातील 15 लाख 29 हजार 728 मतदार आपला खासदार निवडण्यासाठी आज मतदान करीत आहेत.रायगड मतदार संघाचं वैशिष्टय असंय की,इ थं पुरूष मत दारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 28 हजार 982नं जास्त आहे.रायगडमध्ये ज्या सहा विधानसभां मतदार संघाचा समावेश केला गेलेला आहे त्यापैकी अलिबाग,पेण आणि महाडमधील विधानसभा मतदार संघात महिला आणि पुरूषांची संख्या जवळपास सारखी असली तरी श्रीवधऱ्न,गुहागर आणि दापोलीमघ्ये महिला मतदार अधिक आहेत. मतदार संघात 7 लाख 50 हजार 373 पुरूष आणि 7 लाख 79 हजार 355 महिला मतदार आहेत. त्यामुळं रायगडच्या चाव्या खऱ्या अर्थानं महिलांच्याच हाती आहेत.मावळ मतदार संघातील रायगडच्या पनवेल,उरण आणि कर्जत या तीन विधानसभा मतदार संघात महिलांनी केलंलं लक्षणिय मतदान बघ ता रायगडमध्येही महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतील अशी शक्यता आहे.महिला मतदारांचा जिल्हयातील प्रभाव लक्षात घेऊनच सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांन महिला नेर्तृत्वाला पुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणूनच प्रचारातही महिलां नेत्यांची उपस्थिती प्रकर्षानं जाणवत होती.रायगड लोकसभा मतदार संघात एकूण 10 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत.त्यात शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे अनंत गीते,राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडीचे सुनील तटकरे,शेतकरी कामगार पक्षाचे रमेश कदम आणि आम आदमी पार्टीचे संजय अपरांती या चार प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.या दहा उमेदवारांपैकी जिल्हयातील मतदार कोणाला कौल देतात ते 16 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
– रायगडमध्ये 2009 च्या निवडणुकीत शेकापनं युतीला पाठिंबा दिलेला होता.मात्र यावेळी शेकापनं रमेश कदम यांना उमेदवारी दिली आहे.कदम यांना मनसेनं पाठिंबा तर दिलेला आहेच त्याच बरोबर शेकापचे परंपरागत प्रतिस्पर्धी राहिलेले कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अ.र.अंतुले यांनीही पाठिंबा दिला आहे.अंतुलेंनी रायगडमधील आपल्या मित्रांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र मंगळवारी प्रसिध्दीस दिलं आहे.त्या पत्रात सुनील तटकरे यांच्यावर बरेच आरोप कऱणयात आले आहेत.हे पत्र आणि अंतुलेंनी शेकापला दिलेला पाठिंबा मतदार किती गंभीरपणे घेतात हे बघण्यासारखं आहे.सुनील तटकरे यांच्या मतांचं विभाजन करण्यासाठी विरोधकांनी सुनील तटकरे या नावाचाच अन्य एक उमेदवार उभा केला आहे.पुर्व इतिहास बघ ता अनेकदा जिल्हयात असे डमी उमेदवार उभे केले गेले असले तरी त्याचा मुख्य उमेदवारावर फारसा कधी परिणाम झाल्याचं दिसेलं नाही.डमी अब्दुल रहेमान अंतुलेंचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही डमी उमेदवाराला फार काही मतं मिळालेली नाहीत.अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे याच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष सुनील तटकरे किती मतं घेतात हे पाहणंही महत्वाचं आहे.
2) रायगडमध्ये स्टार प्रचारकांची हजेरी
——————————–
– रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली असल्यानं बहुतेक पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या प्रचारसभांनी रायगड अक्षरशः ढवळून निघाला.महायुतीचे अनंत गीते यांच्या प्रचारासाटी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,मनोहर जोशी,आदित्य ठाकरे ,भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे,आरपीआयचे रामदास आठवले आदिंनी वेगवेगळ्या भागात सभा घेतल्या,रोड शो केले.आघाडीचे सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार,अजित पवार,आर.आर.पाटील,यांनी जिल्हयात दोन दोन दौरे केले.मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण,नारायण राणे यांनीही अलिबागला सभा घेतली.शेकापचे रमेश कदम यांच्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी झंझावाती दौरे केले.शेकापला मनसेने पाठिंबा दिलेला असल्यानं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही
म हाड येथे सभा झाली.आम आदमी पार्टीचे डॉक्टर संजय अपरांती काहीसे एकाकी प्रचार करताना दिसले.त्यांच्या प्रचारासाठी अंजली दमानियांनी पेण य़ेथे सभा धेतली.उल्का महाजन,सुरेखा दळवी आपचा प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा
—————————————————–
– रायगड मत दार संघातील मतदारांची टक्केवारी नेहमीच कमी असते.या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी यावेळेस जिल्हा प्रशासनाने प्रचंड मेहनत केल्याचे दिसते.निवडणुका जाहीर होताच मत दार जागृती अभियानच जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कऱण्यात आलं होतं.या अभियानाचा भाग म्हणून खालापूरपासून पोलादपूरपर्यत सर्वत्रच रॅली काढण्यात आल्या,ग्रामस्थांच्या सभा घेऊन त्यांना मतदानाचं महत्व समजावून संागितलं गेलं.महाविद्यालीयन तरूणांना या अभियानात सहभागी करून घेण्यात आलं होतं.मतदानाचं आवाहन करणारा एक चित्ररथही जिल्हयाच्या वेगवेगळ्या भागात फिरविण्यात आला.तसेच मत दारांमधील भिती दूर व्हावी आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होऊन त्यांनी निर्भय़पणे मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी मत दार संघातील अनेक शहरात गेल्या दोन दिवसात
पोलिसांनी संचलन केले या साऱ्या प्रयत्नांचा मावळ मत दार संघात येत असलेल्या पनवेल,उरण,कर्जतमध्ये नक्कीच फायदा झाला.या भागात 65.19 टक्के मतदान झाले.हे मतदान गतवेळच्या मतदानापेक्षा 17 ते 18 टक्क्यांनी जास्त आहे.प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नाचा फायदा रायगड लोकसभा मत दार संघातही नक्की होईल येथेही आज जास्तीत जास्त मत दानासाठी घरातून बाहेर पडतील असे वातावरण आहे.

– रायगडमधील प्रश्नांकडं दुर्लक्षच
————————
– रायगडमधील जनता विविध प्रश्नांनी जेरीस आलेली असताना निवडणुकीच्या प्रचारात या प्रश्नांची फारशी च र्चा झालीच नाही. आयगडमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले असतानाही येथे बेकारीचा प्रश्न कमालीचा उ ग्र आहे.या प्रश्नावर तर कोणत्याही उमेदवारानं काहीही भाष्य केलेलं नाही. रायगडमध्ये नवी मुंबई विमानतळ,दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर,मुंबई-गोवा महामर्गाच्या रूंदीकऱणातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबद्दल कोणी फारसे बोललेच नाही.रेल्वेचे प्रश्न,प्रदूषणाचे प्रश्न आणि महत्वाचे म्हणजे पाणी टंचाईच्या विषयालाही कोणी स्पर्श केलेला नाही.जिल्हयातील विविध चार सहकारी बॅंका बुडाल्यानं दोन लाखांवर ठेवीदारांचे पैसे त्यात अडकले आहेत.परवा शरद पवारांनी यावर वरवरचे भाष्य केलं असलं तरी ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस काही कऱण्याचं आश्वासनही कोणीच दिलं नाही.जिल्हयात खारलॅन्डचा प्रश्नही गंभीर बनलेला आहे.समुद्राचं पाणी सुपीक शेतीत घुसून शेती नष्ट होऊ लागली आहे.जिल्हयातील शेतकऱ्यांच्यादृष्टीनं हा विषय जिव्हाळ्याचा असतानाही राजकीय पक्षांना मात्र तो महत्वाचा प्रश्न वाटलाच नाही. उलटपक्षी रायगडमधील पत्रकारांनी चार वर्षे सतत आंदोलनं केल्यानं मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरू झालंय पण त्याचं श्रेय घेण्याचाच प्रय़त्न काही उमेदवारांनी केला.निवडणूक प्रचार गाजला तो व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांनी.शेकापनं एक श्वेत पत्रिका काढून आणि अ.र.अंतुले यंानी सुनील तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर शरद पवार यांनी शेकापनं कसा संधीसाधूंचा पक्ष झालाय हे काही दाखले देत लोकांसमोर मांडलं.अनंत गीतेंच्या कथित निष्क्रीयतेवरही शेकाप आणि राष्ट्रवादीने हल्ला चढविला तर शेकापने आयात उमेदवार जनतेवर लादल्याचे आरोपही झाले.त्यामुळं जिल्हयातील प्रश्नांवर च र्चा अशी झालीच नाही.त्यामुळं निवडणुका होतील,निकालही लागेल आणि नवे सरकारही केंद्रात येईल पण विविध प्रश्नांच्या जंजाळात अडकलेल्या रायगडची मात्र त्यातून सुटका होण्याची सुतराम शक्यता नाही.

(रायगड जिल्हयाचे हे वार्तापत्र आज दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी आपण आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ऐकू शकाल )

– शोभना देशमुख-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here