आणखी एक वाळित प्रकऱण

0
1102

अकरा महिन्यात 35 वाळीत प्रखरणं उधडकीस आल्यानं खळबळ उडालेल्या रायगड जिल्हयातील म्हसळा तालुक्यात आणखी एका कुटुंबाला वाळित टाकल्याचे प्रकऱण समोर आल्याने वाळित प्रकरणाची अखंडित मालिका थांबायला तयार नसल्याचे दिसते आहे.
म्हसळा तालुक्यातील वारळ येथील अरूण चद्रकांत चाळके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वयंभू गुरूदत्त मंडळाच्या 14 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.जमिनीच्या वादातून 29 वर्षापूर्वी आपल्या कुटुंबास वाळित टाकण्यात आले असल्याचे अरूण चाळके यांनी तक्रारीत म्हटले आहे.वारळ येथील साडेतीन एकर जमिन सरकारने तीस वर्षासाठी चाळके यांच्या आजोबाांना दिली होती.ती जागा 1978मध्ये सरकारने ताब्यात घेतली होती.ती जागा स्वयंभू गुरूदत्त मंडळाला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.मात्र फिर्यादीने त्यास विरोध केल्याने हे वाळित प्रखरण घडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here