रायगड किल्ल्याच्या मुळ स्वरूपात कुठलाही बदल न करता किल्लयाची डागडुजी करून रायगड किल्ल्याला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज किल्ले रायगडावर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर श्री.शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी विनायक मेटे आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होतेे.
संरक्षण मंत्री म्हणाले,अनेक आव्हाने आहेत पण त्यांना सामोरे जात शिवरायांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी आपण सर्वांनी कटीबध्ध असले पाहिजे.
यावेळी मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते गडारोहण केलेल्या स्पर्धकांचा तसेच कीर्तनकार .शाहिरांचा सत्कार कऱण्यात आला.प्रारंभी पर्रिकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.कार्यक्रमानंतर राज दरबार ते शिवसमाधी अशी शिवप्रतिमा मिरवणूक काढण्यात आली.