रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या शनिवारी रायगडात दोन सभा घेणार आहेत.राज ठाकरे यांची पहिली सभा दुपारी 4 वाजता महाड येथे आणि दुसरी सभा 7 वाजता पनवेलनजिक खांदेश्वर येथे होणार आहे.रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप यांना मनसेने पाठिबंा दिलेला आहे.