मोर्चांची सर्वत्र जोरदार तयारी

0
696

विवारचे पत्रकारांचे आंदोलन ऐतिहासिक ठरणार ,मोर्चांची सर्वत्र  जोरदार तयारी

पत्रकार संरक्षण कायदा आणि अन्य मागण्यांसाठी गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे येत्या रविवारी महाराष्ट्रात होत असलेल्या पत्रकार निर्धाऱ मोर्चाची राज्यभर जोरात तयारी झाली असून राज्यातील सर्व जिल्हयातून पंचवीस हजार पत्रकार रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करतील.ठाणे,रायगड,नाशिक,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,जळगाव,अकोला,अमरावती,नागपूर,नांदेड,परभणी,जालना,औरंगाबाद,उस्मानाबाद,नगर,पुणे सांगली,हिंगोली,वाशिम या व इतर अन्य जिल्हयातील पत्रकारांनी 2 ऑक्टोबरच्या तयारीसाठी गेली दोन दिवस बैठकांचे आयोजन केले होते.जिल्हयातील वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी ज्या संख्येने या बैठकांना उपस्थित होते ते बघता राज्यात रविवारचं आंदोलन अभूतपूर्व होणार याबद्दल शंका उरलेली नाही.आपसातील मतभेद बाजुला ठेवत संघटना तर या लढ्यात उतरतच आहेत त्याचबरोबर पत्रकारही मोठ्या संख्येने आंदोलनात उतरत असल्याने 2 ऑक्टोबरचे आंदोलन एैतिहासिक होणार याबद्दल दुमत नसावे.राज्यात एकाच वेळी सर्व 36 जिल्हयात हे आंदोलन होत असल्याने राजकीय मंडळी आणि सामांन्य जनतेलाही या आंदोलनाबद्दल उत्सुकता असून वेगवेळ्या जिल्हयात विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा देणारी पत्रकं काढली आहेत.रविवारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे,मूक मोर्चा काढून आपला आवाज सरकारपर्यंत जाईल याची काळजी घ्यावी असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here