मोरा बंदर ते भाऊचा धक्का स्पीड बोट सेवा 

0
839
अलिबाग- उरण नजिकचे मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान  स्पीड लॉंच सेवा सुरू होत असल्याने उरणकरांसाठी आता मुंबई हाकेच्या अंतरावर असणार आहे.मोरा ते भाऊचा धक्का या जलमार्गावर स्पीड लॉंच सुरू करावी ही उरणकरांची गेल्या अनेक दिवसांची मागणी  पूर्ण होत असल्याने उरण आणि परिसरातील जनता  आनंदात आहे.आर.एन.शिपिंगच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात येत आहे.या मार्गावर आतापर्यत परंपरागत बोटसेवा सुरू होती.त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी बराच वेळ जायचा.स्पीड बोट सेवेमुळे मोरा बंदर ते भाऊचा धक्का हे अंतर काही मिनिटात कापले जाणार आहे.
स्पीड बोट सेवेचा शुभारंभ 17 एप्रिल रोजी सायंकाळी भाऊचा धक्का येेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here