शत्रूत्व जिंदगी के साथ भी,जिंदगी के बाद भी..
अमेरिकेत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या एका पाहणीत पत्रकाराची नोकरी वेटर किंवा कसाई यांच्या पेक्षाही वाईट असल्याचं आढळून आलं होतं.पत्रकारिता सर्वात निकृष्ट तर आहेच त्याच बरोबर सर्वात धोकादायक हा पेशा असल्याचंही पाहणीतून स्पष्ट झालं होतं.पत्रकारांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात आणि हे शत्रू एवढे पाताळयंत्री असतात की,मृत्यू नंतरही ते आपला बदला घेताना मागं पुढं पाहात नाहीत.मामला गुवाहाटीचा आहे.येथील एक दैनिक पूर्वोदय संपादकांचे निधन झालेले आहे,मात्र आता त्याच्या पत्नीला समन्स पाठविण्यात आलं आहे.एका ऑफीसला आग लागून त्यात एका कर्मचार्याचं निधन झालं होतं.त्याची बातमी पूर्वोदयमध्ये प्रसिध्द झाली होती.त्या बातमीच्या विरोधात जेथे आग लागली त्या उद्योग समुहाचे मालक आनंद पोद्ार यांनी कामरूप नगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.दरम्यानच्या काळात संपादकांचे निधन झाले .मात्र न्यायाधीश महोदयांनी संपादकांच्या पत्नी अमिता पाठक यांना स्व.पाठक यांच्या उत्तराधिकारी समजून त्यांच्यावर समन्स ठोकले असून 8 जानेवारी रोजी कार्टात हजर राहण्याचा आदेश ठोठावला आहे..संपादकाचं अचानक निधन झाल्यानं दुःखात असलेल्या पाठक परिवारासमार आता नवे संकट उभे राहिले आहे. असं म्हटलं जातं की,मृत्यू नंतर शत्रूत्वही संपते.मात्र कारच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय कऱणार्या आनंद पोद्यारला मृत व्यक्तीच्या परिवारास छऴण्यात आनंद मिळत आहे.संपादकाचं निधन झाल्यानं या उद्योगपतीनं आनंद तर व्यक्त केला आहेच आता मृत संपादकांच्या नातेवाईकांना छळण्यात तो धन्यता मानताना दिसतो आहे.म्हणजे जिंदगी के साथ भी,जिंदगीके बाद भी शत्रूत्व पाठपुरावा करीत असते.लोकांना पत्रकारितेतीली केवळ चमक दिसते,त्या झगमगाटा मागचा काळोख दिसत नाही,हे दुर्दैव आहे.–