सोमवारी मुरूडच्या समुद्र किनार्यावर झालेल्या दुर्घटनेचा मुरूडच्या पर्यटन व्यवसायावर खोलवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.सध्या पर्यटनाचा हंगाम असला तरी मुरूड दुर्घटनेनंतर येणार्या पर्यटाकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे.ज्या शाळा,कॉलेजेसने हॉटेल,रिसॉर्टचे बुकींग केलेले होते त्यांनी ते रद्द केले असल्याची माहिती या व्यवसायातल्या लोकांनी दिली आहे.यामुळे खानावळवाले,छोटे-मोठे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.’मुरूडचा समुद्र माणसं का गिळतोय’? असा प्रश्न उपस्थित करणार्या बातम्या काही वाहिन्यांनी दाखविल्याने त्याचा विपरित परिणाम झालेला आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान सोमवारच्या दुर्घटनेचा परिणाम पर्यटन व्यवसायावर जाणवू नये यासाठी आता नगरपालिका सज्ज झाली असून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरू झालेल्या आहेत.मुरूडच्या किनार्यावर एक कर्मचारी कायम स्वरूपी ठेवला जाणार असून पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून तो रोखणार आहे.शिवाय एक होमगार्डची देखील नियुक्ती केली जाणार आहे.ग्रोएन्स बंधारे,गोव्याच्या धर्तीवर मनोरे,दुर्बिण आदि व्यवस्था कऱण्यासाठीही नगरपालिका विचार करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली.समुद्रात जे धोकादायक स्पॉट आहेत तेथे फलक लावले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.-