मुंबई-गोवा – 3 वर्षात 358 बळी

0
871

मुंबई-गोवा महामार्गः 3 वर्षात 358 बळी
चौपदरीकरण रखडल्याचा परिणाम
मुंबई-गोवा महामर्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेलं काम,त्यामुळं ठिकठिकाणी फुटलेले रस्ते,वळण रस्ते,रस्त्यावर पडलेला राडारोडा याची जबर किंमत कोकणातील जनतेला मोजावी लागत असून काम सुरू झाल्यापासूनच्या तीन वर्षात महामार्गावर झालेल्या तब्बल 1,622 अपघातात 358 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर 1595 जण गंभीर जखमी झाले आहेत.या विरोधात आता न्यायालयात जाण्याचा विचार जिल्हयातील पत्रकार करीत आहेत.
कोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2012 मध्ये सुरू करण्यात आले.इंदापूर ते पळस्पे या 84 किलो मिटरच्या पहिल्या टप्प्याचं काम मार्च2014 मध्ये पूर्ण होईल असे नियोजन होते.मात्र 2015 चा मे उजाडला तरी काम 30
टक्के देखील पूर्ण झालेलं नाही.आता तर ठेकेदार कंपन्या काम अर्धवट सोडून निघून गेल्या आहेत.काम सुरू असल्यानं ठिकठिकाणी रस्ते फुटले आहेत,अनेक ठिकाणी वळणं वापरावी लागत आहे,बांधकामाचं साहित्य मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडलेलं आहे.त्यामुळं महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचं झालं आहे.या विरोधात 24 जानेवार 2015 रोजी रायगडच्या पत्रकारांनी पेणला रास्ता रोको आंदोलन केले होते.त्यानंतर बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या तारखा देत या काळात रस्त्याचं काम पूर्ण क़रण्याचं वादे केलेे होते.ते वादे पूर्ण झालेच नाहीत.आता पावसाळा ताोडावर आल्यानं तत्पुर्वी रस्ता दुरूस्त होण्याची शक्यता नाही.माजी मंत्री सचिन अहेर असतील किंवा विद्यमानं मंत्री चंद्रकांत पाटील असतील यांनी आणखी एक शब्द दिला होता.अपघाताना जबाबदार असलेल्या ठेकेदारंाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा.तीन वर्षात352 बळी गेल्यानंतरही असा कोणताही गुन्हा ठेकेदारावर दाखल झालेला नाही.
जिल्हयात सर्वत्रच अपघात वाढले
————————
जिल्हयात तीन वर्षात 4 हजार 258 अपघात झाले त्यात 1007 बळी गेले.3515 जखमी झालेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रायगड हद्दीत 663 अपघात झाले.त्यात 162 मृत्यू झाले.282 जखमी झााले.मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ( एनएच-4) 417 अपघात झाले.त्यात 108 मृत्यू 134 जखमी झालेत.तर जिल्हयात अन्य मार्गावर तीन वर्षात 1556 अपघातात 379 मृत्यू 1500 जखमी झाले.जानेवारी 2012 ते मार्च 2015 या काळातील ही आकडेवारी आहे.कोकणातील तीन जिल्हयातील अपघातांच्या संख्येत अपघातांच्या बाबतीत रायगड आघाडी रस्त्यावरील वाढलेल्या अपघाताच्या विरोधात जिल्हयात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून या लोकभावनेची दखल घेत जिल्हयातील पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून .आंदोलन करण्याचा निणर्य घेतला आहे.त्यानुसार येत्या १६ जून रोजी रायगडसह कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकार वडखळ ते पेण लाॅंगमाचर् काढणार आहेत.वर आहे.या अपघातांना जिल्हयातील खराब रस्ते,रस्त्यावरील वळणं,वाढलेली वाहतूक ,वाहतूनक पोलिसांचा अभाव,अशी काही कारणं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here