महाराष्ट्रातील प्रमुख गिरीस्थान नगरपालिकांपैकी एक असलेल्या माथेरान नगरपालिकेच्या 25 कोटी रूपयांच्या अर्थसकल्पास नगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.प्रवासी करात किंवा अन्य करात कोणतीही नवी करवाढ नसलेला आणि शहराच्या स्वच्छतेवर भर देणारा हा अर्थसंकल्प नगराध्यक्षा दीव्या डोईफोडे यांनी सादर केला.
माथेरानचे पर्यटन विषयक असलेले महत्व लक्षात घेऊन पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक,शौचालय,इको टुरिझम आदि कामांसाठी भरीव आर्थिक तरतूद कऱण्यात आली आहे.माथेरानमंध्ये वाहनांना बंदी असून दस्तुरी नाका येथेच सारी वाहनं ठेवावी लागतात.त्यामुळे दस्तुरी नाक्यावर वाहनतळ उभारण्यासाठी 1 कोटी 25 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.नगरपालिकेला प्रवासी करातून 3 कोटी 18 लाख रूपये मिळतात याशिवाय सरकारच्या विविध योजनांतुन 19 कोटी 56 लाख रूपये आणि नगरपालिका करातून 41 लाख रूपयांचा महसुल जमा होण्याची शक्यता आहे.क