माणगावात शेतकऱ्यांचा मोर्चा

0
856
दिल्ली-मुंबई अौद्योगिक कॅरिडोरला विरोध करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या माणगाव,रोहा,तळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यानी आज माणगावच्या उपविभागीय कायार्लयावर ध़डक दिली. पाऊस असतानाही चारशेवर शेतकरी या माेचार्त सहभागी झाले होते.या अौद्योगिक कॅरिडाेरमुळे माणगाव,रोहा आणि तळा तालुक्यीतील ७१ गावातील जवळपास ६७,५०० हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे.त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे.आज मोचार् काढून शेतकऱ्यांनी आपला विरोध प्रकट केला.माणगाव येथे उपविभागीय अधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना उद्दवस्त करणारा दिल्ली मुंबई अौद्योगिक कॅरिडोर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे.आजच्या मोचार्चे नेतृत्व दिल्ली-मुंबई अौद्यिगक कॅरिडोर विरोधी संघषर् समितीच्या नेत्या उल्का महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here