महिला लोकशाही दिनाबद्दल उदासिनता

0
834

रायगड जिल्हयात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्यानं वाढत असल्या तरी महिला लोकशाही दिनाला मात्र प्रतिसादच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.महिलांच्या तक्रारी,अडचणीची सोडवणूक व्हावी यासाठी 4 मार्च 2013 पासून महिला लोकशाही दिनास सुरूवात झाली.तालुका स्तरावा चौथ्या सोमवारी,जिल्हा स्तरावार तिसर्‍या सोमवारी तर विभागीय आणि राज्यस्तरावर दुसर्‍या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.मात्र रायगडात आणि विशेषतः दक्षिण रायगडमधील महाड,पोलादपूर,म्हसळा,श्रीवर्धन,माणगाव तालुक्यात महिला लोकशाही दिनाबाबत कमालीची उदासिनता दिसून येते.त्यामुळे या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here