रायगड लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण आता तापायला सुरूवात झाली असून जिल्हयात मोठ्या प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.महायुतीचे उमेदावर अनंंत गीते यांच्या प्रचारासाठी आज अलिबाग येथील जेएसएम कॅलेच्या मैदानावर महायुतीची प्रचारसभा होत असून सेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे,भाजप नेते गोपीनाथ मुंडे,आरपीआयचे रामदास आठवले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी ,महादेव जानकर आदि नेते सभेत मार्गदर्शन करणार आहेत.युतीचे नेते अनेक दिवसापंासून एकत्र दिसत नाही अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे.रायगडात शेकापनं शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा केलेली आहे.जिल्हा परिषदेत शिवसेना-शेकाप युतीची सत्ता असल्यानं उध्दव ठाकरे आजा काय भूमिका मांडतात याकडेही संपूर्ण जिल्हयाचं लक्ष आहे.
आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांचीही 2 एप्रिल रोजी अलिबागला सभा होत आहे.सुनील तटकरे आपला उमेदवारी अर्जही दोन तारखेलाच दाखल क रणार आहे.या दोन्ही मोठ्या सभामुळे रायगडचे राजकारण ठवळून निघणार आहे.