मित्रहो,
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3डिसेंबर 1939 रोजी झालंी आहे.येत्या 3 डिसेंबर रोजी परिषद 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.परिषदेचा हा आणि यापुढे येणारा प्रत्येक वर्धापन राज्यभर उत्साहाने साजरा केला जावा अशी अपेक्षा आहे.( परिषदेची स्थापना कधी झाली हेचे आतापर्यत माहिती नसल्याने तो यापुर्वी साजरा केला गेला नाही.आता त्यासबंधीची अधिकृत कागदपत्र उपलब्ध झाली आहेत) 76 व्या वर्धापनदिनाचे औचित्यसाधून राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घ्यावीत अशी सर्व जिल्हयांना विनंती आहे.आपणास कल्पना असेल की,राज्यात गेल्या काही दिवसात सहा पत्रकारांचे ह्रद्यविकाराने निधन झाले आहे.तेही अगदी तरूण पणात.याचा अर्थ आपण आपल्या प्रकृत्तीची काळजी घेत नाही.तेव्हा परिषदेनेच पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रत्येकजिल्हयात,तालुक्यात अशी शिबिरं घेतली जावीत.ही विनंती आहे.रायगड आणि पुणे जिल्हयासह अनेक जिल्हयात हा उपक्रम राबविला जात आहे.आपल्या गावातील डॉक्टरांच्या मदतीनं हा उपक्रम पार पाडता येईल.तेव्ही प्लीज.
या ग्रुपमध्ये ज्या जिल्हयातीलल पदाधिकाऱ्यांचा समावेश नाही त्याना आपण कळविण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आहे.कळावे — एस.एम,देशमुख