मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी विभागीय सचिवांच्या काल नाशिक येथे घोषणा केल्या आहेत.विभागीय सचिवांनी आपल्या विभागात संस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त पत्रकारांना परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.अमरावती विभागातील सचिवाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच उपाध्यक्षांच्या नावांची घोषणाही लवकरच करण्यात येणार असल्याचे किरण नाईक यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी परिषदेचे कार्याघ्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर आदि उपस्थित होते,विभागवार चिटणीस खालील प्रमाणे
1) मुंबई विभाग — विकास महाडिक – नवी मुंबई
2) पुणे विभाग — डी.के.वळसे पाटील -पुणे
3) कोकण विभाग- मिलिंद अष्टीवकर -रोहा
4)कोल्हापूर – चद्रकांत पाटील- कोल्हापूर
5) आौरंगाबाद विभाग- सुनील वाघमारे- औरंगाबाद
6) लातूर विभाग – केशव-धोणसे पाटील- नांदेड
7) नागपूर विभाग – संजय देशमुख- नागपूर
8)नाशिक विभाग – अशोक भाटिया- जळगाव