आपल्या एका मतानं 1998मध्ये जातीयवादी भाजपचे सरकार पडले असा प्रचार करीत पुन्हा 1999ची लोकसभा जिंकणारे कॉग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.त्यासाठी त्यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.त्यानंतर पनवेल येथे समर्थकांच्या बैठकीत त्यांनी भाजपवर स्तुतीसुमने उधळली.ते म्हणाले भाजप हा सर्वसामांन्यांचा पक्ष आहे.या पक्षात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सन्मान केला जातो.त्यामुळंच आपण भाजपमध्ये जात असून भाजपची सत्ता आल्यानंतर खारघर टोलचा प्रश्न सुटेल अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांनी आपणास दिल्याचे रामशेठ ठाकूर यानी सांगितले आहे.कालपर्यत ज्या पक्षाची जातीयवादी अशा शेलक्या शब्दात संभावना केली जायची तोच पक्ष आज सर्व जातीं-धर्मांना सामावून घेणारा ठरला आहे.ठाकूर पिता-पुत्रांच्या विचारातील हा बदल थक्क करणारा आहे.
ठाकूर पिता-पूत्रांच्या विचारात हा बदल का आणि कशासाठी झाला,खारघर टोल हे खऱंच पक्षांतराचं कारण आहे की आणखी काही,रामशेठ यांच्या कालच्या बैठकीला श्याम म्हात्रे,महेंद्र धरत आणि अन्य काही प्रमुख कार्यकर्ते का आले नाहीत या आणि अशा प्रश्नांची उत्तर शोधणं रंजक ठरणारं आहे.