-
ढाका : बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. यात बेकायदा ठरविण्यात आलेल्या अन्सरुल्ला बांगला टीमच्या प्रमुखाचा समावेश आहे.
बांगलादेशात अलीकडेच काही ब्लॉगरची हत्या झाली, या मालिकेतील पहिले ब्लॉगर हैदर होते. या मालिकेतील हा पहिलाच निकाल आहे. न्यायालयाने एका खासगी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी मोहंमद फैसल नईम ऊर्फ द्वीप व फरारी असलेला रिझवानूल आझाद राना या दोघांना मरेपर्यंत फाशी सुनावली. न्यायालयाने अन्सरुल्ला बांगला टीमचा प्रमुख मुफती जशीम उदीन रेहमानी व इतर पाच जणांना दोषी ठरविले.(वृत्तसंस्था)