हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठा अभिनेता,आणि उद्योगपतीसह अलिबागनजिकच्या थळ किनार्यावरील 14 अतिक्रमणं जमिनदोस्त करण्यात आली आहेत.ही अतिक्रमणं गुरचरण जमिनीवर तर होतीच त्याचबरोबर सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करूनही ती बांधली गेली होती.जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
रायगड जिल्हयातील मांडवा ते श्रीवर्धन या दरम्यान समुद्र किनार्यावर बडे उद्योगपती,सिने कलावंत तसेच राजकीय नेत्यांची 220 अतिक्रमणं केली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.ही सारी अतिक्रमणं आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत.त्यातील थळ परिसरातील 14 बाधकामं काल आणि आज पाडली गेली.ही बांधकामं थळ बरोबरच किहिम,मांडवा,आवास या परिसरातली आहेतत.