फाशीचीच शक्यता

0
820

मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सेशन्स कोर्टानं कासिम बंगाली, मोहम्मद सलीम आणि विजय जाधव या तिघांना कलम 376 (ई) अंतर्गत दोषी ठरवलं आहे.

महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे २२ ऑगस्ट २०१3 मध्ये फोटोजर्नलिस्टवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्याच आरोपींनी जुलै महिन्यात एका टेलिफोन ऑपरेटरवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती.या गुन्ह्यातील तीन आरोपींचा फोटोजर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातही सहभाग होता. त्यामुळे तिघांवर कलम 376 ई अंतर्गत सुनावणी झाली. बलात्काराचा गुन्हा पुन्हा करणार्‍यांसाठी हे कलम वापरण्यात येतं.या कलमाच्या तरतुदीनुसार कासिम बंगाली, मोहम्मद सलीम आणि विजय जाधव या तिघांना फाशीची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे याप्रकरणातील दोषींना आता काय शिक्षा टोठावली जाते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here