प.बंगालमध्ये पत्रकारांवर हल्ला

0
751

एका न्यूज चॅनलच्या महिला पत्रकाराचा फोटो बस चालकाने आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला विचारणा करणाऱ्या महिला पत्रकारास असभ्य वागणूक दिली गेली आणि तिच्या बचावासाठी आलेल्या अन्य पत्रकारांनाही बस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.याची तक्रार पोलिसात दिली असली तरी अजून कोणाला अटक केली गेलेली नाही.
घटना पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरातली.काल घडलेली.महिला पत्रकार काल रात्री आपली डयुटी संपवून बस मधून घरी जात असताना बसच्या चालकाने तिचा फोटो मोबाईलमध्ये घेतल्याचे संबंधित महिला पत्रकाराच्या लक्षात आलं यावर तिने विचारणा केली असता तिच्याशी चालकांनी दुर्वव्यवहार केला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक माध्यमकर्मी तिथं जमा झाले.त्याच वेळेस अन्य बसचे कर्मचारीही तेथे आले.त्यांनी एकत्र येत पत्रकारांना बेदम मारहाण केली.यामध्ये चार पत्रकार जखमी झाले आहेत.आरोपींना तातडीनं अटक करावी यामागणीसाठी पत्रकारांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here