परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा 23 मार्चला नगर येथे मेळावा

0
952

मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासातील पहिलाच उपक्रम

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या तालुका अध्यक्षांचा एक मेळावा नगर येथे 23 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.परिषदेच्या 75 वर्षांचा इतिहासात तालुका अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ असल्याने निवडणुकांच्या धामधुमीत देखील राज्यातील 250च्या वर तालुका अध्यक्ष या मेळाव्यास उपस्थित राहतील असा विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक आणि माजी अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी काल नाशिक येथील जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं रविवारी जिल्हयातील पत्रकारांचा मेळावा आय़ोजित करण्यात आला होता.यावेळी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज ,परिषदेचे संपर्क प्रमुख श्रीराम कुमेठेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा,विजय बाबर,पत्रकार संघाचे ्‌अध्यक्ष य़शवंत पवार,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज,कळवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवरे तसेच जिल्हयातील चारशेवर पत्रकार उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे काम प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे आणि राज्यातील सर्वच्या सर्व तालुके म्हणजे 358 तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत. मात्र आतापर्यत तालुका पत्रकार संघाचा थेट संपर्क परिषदेशी येत नव्हता.यापुढे प्रत्येक तालुके थेट परिषदेशी जोडण्याची परिषदेची योजना आहे.तालुका स्थरावरील पत्रकारांना अनेक प्रश्नांशी झगडावे लागते.तालुका स्तरावरच पत्रकारांवर जास्तीत जास्त हल्ले होत असतात.शिवाय ते संघटीत नसल्याने तसेच ते ज्या दैनिकाचे काम करतात ती दैनिकंही अनेक प्रकरणात संबंधीत वार्ताहरांच्या पाठिशी उभी राहत नसल्याने हे पत्रकार एकाकी पडतात.अनेकदा ते नैराश्येच्या गर्देत जातात आणि त्यातून अनेक जण पत्रकारितेतूनही बाद होतात.अशा पत्रकारांच्या पाठिशी परिषदेने खंबीरपणे उभे राहण्याची आश्वासक भूमिका घेतली.त्यामुळे या मेळाव्यास जास्तीत जास्त तालुका अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.
अधिक माहितीसाठी पत्रकारांनी एस.एम.देशमुख 9423377700 किंवा किरण नाईक 9820784547 या क ्रमंाकावर सपर्क साधावा असे आवाहनही परिषदचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेर .सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here