सिनेमा वादग्रस्त करा,न्यायालयात जाईल अशी व्वयस्था करा तो आपोआपच चालतो.हे तंत्र संजय लिला भन्साळी यांना चांगलंच जमलंय.बाजीराव -मस्तानीच्या वेळेस त्यांनी हेच केलं,पद्मावतीच्या निमित्तानं हाच खेळ सुरूय.
मात्र हा खेळ खेळण्याची मक्तेदारी काही संजय लिला यांचीच आहे असं नाही.इतरही प्लेअर आहेत.आता हेच बघा ‘आप’ले अरविंद केजरीवाल यांच्यावर एक 100 मिनिटाची फिल्म तयार झालीय.आज या फिल्मची स्क्रिनिंगही दिल्लीत झाली.मात्र ही फिल्म वादग्रस्त झाली नाही तर ती पाहिल कोण ? त्यामुळं आता ही फिल्म देखील न्यायालयात गेलीय.गुजरातमधील वकील भाविक समानी यांनी अहमदाबाद उच्च न्यायालयात या फिल्मच्या विरोधात जनहित याचिका दाखल केलीय.17 नोव्हेंबर रोजी रिलिज होणार्या या फिल्मला प्रतिबंध घालावा असा या वकिलसाहेबांचा आग्रह आहे.त्याचं म्हणणं असंय की,गुजरातमध्ये काही ठिकाणी आप निवडणूक लढतोय.या फिल्मचा निवडणुकीवर परिणाम होईल.एवढंच नव्हे तर जन प्रतिनिधीत्व कायद्याचं देखील त्यामुळं उल्लंघन होईल असं या महोदयाचं म्हणणं आहे.न्यायालय यावर काय निकाल देतंय ते दिसेलच.निकाल काहीही होओ चर्चा तर होणारच ना..केजरीवाल यांच्यावरील या फिल्मचं नाव आहे AN INSIGNIFICANT MAN
खुषबू रांका आणि विनय शुक्ला हे फिल्मचे निर्माते आहेत.
मात्र एक कोडं सुटलं नाही हे वकीलसाहेब कोणत्या पक्षाचे आहेत ते कळलं नाही.