बीड- महाराष्ट्रात गेल्या चार दिवसात पत्रकारांवरील हल्लयाच्या चार घटना घडल्या आहेत.त्यामध्ये पुणे आणि पनवेलमध्ये तर महिला पत्रकारांनाच टार्गेट केलं गेलं आहे.नागपूरात भास्करचं कार्यालय फोडलं गेलं आणि कोल्हापुरातही पत्रकारांना धमक्या आणि धक्काबुक्की केली गेली आहे.या घटनांनी महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संंतापाची भावना आहे.त्याचं प्रतिबिंब आज बीडमध्ये उमटले.मंत्रीपद मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सत्कार कऱण्यात आला.यावेळी महेश वाघमारे संतोष आणि संतोष मानूरकर यांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याकडे पंकजा मुंडे याचं लक्ष वेधलं आणि कायदा करण्याची तसेच पेन्शन योजना लागू कऱण्याची मागणी केली.त्यावर पंकजा मुंडे यांनी कायदा कऱण्याचे आणि पेन्शन योजना लागू कऱण्याचे आश्वासन दिले आहे.