ब्लूमबर्ग आणि सीएनएन प्लसच्या पत्रकार आणि न्यूज अँकर राहिलेल्या लेटिजिया आता स्पेनच्या महाराणी होत आङेत.त्या स्पेनचे युवराज फिलिप यांच्या पत्नी आहेत.18 जून रोजी फिलीप स्पेनचे महाराजा होत आहेत. महाराजा जुआन कार्लोस यांनी सरकारची बागडोर आता फिलीप यांच्या खांदयावर सोपविली जात असल्याची घोषणा केलीय.स्पेनमध्ये राजाच देश आणि लष्कराचे प्रमुख असतात.महाराणी सोफियाचं स्थान आता प्रिन्सेस लेटिजिया घेणार आहे1975 सोफिया महाराणी आहेत.फिलीप यांच्याशी विवाहबध्द होण्यापूर्वी लेटिजिया पत्रकार आणि ऍन्कर होती.प्रिन्स फिलीपबरोबर त्याचा हा दुसरा विवाह आहे.