नांदेडमध्ये पत्रकार खंडेलवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला

0
1012

ram-2नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर काल सायंकाळी मित्रनगर परिसरात तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला गेला.त्यांच्या हाताल जबर दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संदर्भात पोलिसात तक्रार दिली गेली आहे.
काल नांदेडमध्ये एक मर्डर झाला होता.त्याची बातमी कव्हर करण्यासाठी घटनास्थळावर गेलेेले खंडेलवाल यांना पाहून मागील बातमीचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला गेला.तू इथं कशाला आलास असे म्हणत हा हल्ला झाला.तीक्ष्ण हत्याराने खंडेलवाल यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी हात आडवा आणल्याने डोक्यावर होणारा वार हातावर बसला.त्यामुळे हातााला मोठी जखम झाली असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार कऱण्यात येत आहेत.
या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात धिक्कार करीत असून हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here