नांदेडमध्ये पत्रकारांची निदर्शने

0
895

मनपा कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांच्या विरुध्द कार्यवाहीसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मंगळवारी धरणे आंदोलन
नांदेड,दि.१२ (प्रतिनिधी)-दै.एकमतमध्ये शहरातील रस्त्यावरील खड्डयांमुळे ऐन पावसाळयात झालेल्या दुर्दशाबाबत वृत्त प्रसिध्द होताच मनपाचे कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांनी दै.एकमतचे निवासी संपादक चारुदत्त चौधरी यांना भ्रमणध्वनीवरुन अश्‍लिल भाषेत शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांची चौकशी करुन त्यांच्याविरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार दि. १४ जून रोजी दु. १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व मराठी परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार माजी आ.ऍड.गंगाधरराव पटने, परिषदेचे विभागीय सरचिटणीस विजय जोशी, परिषद सदस्य रामभाऊ शेवडीकर, माजी अध्यक्ष गोवर्धन बियाणी, ज्येष्ठ संपादक शंतनु डोईफोडे, दै.लोकमतचे आवृत्ती प्रमुख धर्मराज हल्लाळे, दै.सत्यप्रभाचे संपादक शिवानंद महाजन,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे हे करणार आहेत.
या आंदोलनामध्ये जिल्हयातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन कार्याध्यक्ष कालिदास जहागिरदार, सरचिटणीस नरेश दंडवते,उपाध्यक्ष ऍड.दिगंबर गायकवाड,सौ.अनुराधा विष्णुपुरीकर, प्रभाकर लखपत्रेवार, सुभाष लोणे,किरण किनवटकर,कोषाध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष राजू परदेशी, परिषद प्रतिनिधी प्रदीप नागापूरकर, कार्यकारिणी सदस्य संजय कोलते, महेंद्र देशमुख, शिवराम कोंडे, सचिन मोरे, पंडित पतंगे, एल.ए.हिरे,मधुकर अनेलवार,नरेंद्र गडप्पा, फुलाजी गरड,सुभाष पेरकेवाड, बालाजी दुरपडे,मुक्तेश्‍वर पाटील, अर्धापूरचे अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे,सरचिटणीस हिरामण वाघमारे, मुखेडचे तालुकाध्यक्ष संतोष बेळगे,  सरचिटणीस किशोर संगेवार, देगलूरचे तालुकाध्यक्ष शाम वद्देवार,सरचिटणीस सुभाष शंकपाळे, कंधारचे तालुकाध्यक्ष  बाबूखान पठाण, सरचिटणीस ऍड.सत्यनारायण मानसपुरे, लोहा तालुकाध्यक्ष हरिहर दुधमल, सरचिटणीस शेख अहेमद,नायगाव तालुकाध्यक्ष माधव मामा कोकुर्ले,सरचिटणीस गजानन चौधरी,धर्माबाद तालुकाध्यक्ष जि.पी.मिसाळे, सरचिटणीस अशोक पडोळे, उमरी तालुकाध्यक्ष बी.व्ही.चव्हाण, सरचिटणीस नारायण यम्मेवार, भोकर तालुकाध्यक्ष मनोज गिमेकर,सरचिटणीस श्रीकांत देव,हिमायतनगर तालुकाध्यक्ष सोपान बोंपीलवार, सरचिटणीस गंगाधर वाघमारे, किनवटचे सरचिटणीस फुलाजी गरड,विजय जोशी,माहूरचे तालुकाध्यक्ष अनिल रुणवाल,सरचिटणीस नंदकुमार जोशी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here