कॉंग्रेसचे बोलबच्चन महासचिव दिग्विजय सिंह यांचे एक महिला पत्रकार अमृता राय याच्याबरोबर संबंध असल्याचं समोर आलंय.अमृता बरोबर आपले संबंध आहेत हे मान्य करायला आपल्याला कसलाही संकोच नाही हे दिग्विजय सिंह यांनी टिंटमध्ये स्पष्ट केलंय.हा आपला व्यक्तिगत विषय आहे आणि त्यात इतरांनी लक्ष घालणे योग्य नसल्याचं तयांनी म्हटलं आहे.दिग्गी राजाचं टिंट आल्यावर अमृता रायनंही टि्ट केलं.आपण आपल्या पतीबरोबर घटस्फोट घेण्याचं नक्की केलंय,कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं त्यानी म्हटलंय
दिग्विजय सिंह यांची पत्नी आशा सिंह याचं गेल्यावर्षीच निधन झालंय.त्या अनेक दिवस आजारी होत्या.
कोण आहेत या अमृता राय वरिष्ठ पत्रकार प्रा.आनंद प्रधान यांच्या त्या पत्नी होत.असं सागितलं जातंय की,त्याचा आज तलाक झाला आहे.आनंद प्रधान हे गाजीपूरचे राहणारे आहेत.अमृता राय अगोदर एनडीटीव्हीमध्ये होत्या.तेथून त्यांना सतीश सिंह न्यूज मध्ये घेऊन गेले.तेथून झी आणि नंतर राज्यसभा टीव्हीत त्या गेल्या.साहित्याची चांगली जाण असलेल्या अमृता राय यांची बीएजीमधून आपल्या पत्रकारितेला सुरूवात केली ाहोती.त्या स्टार न्यूजच्या कोअर कमिटीच्याही सदस्या राहिलेल्या आङेत.तेथून एनडीटीव्ही आणि त्या अगोदर सीएनईबी असा त्यांचा प्रवास झाला आहे.
दिग्विजय सिंह यांच्याबरोबर त्यांचे संबंध असल्याच्या बातमीनं देशभऱ खळबळ उडाली आहे.