नव्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद व वारंगल या शहरातील “श्रमिक” पत्रकारांना मोफत प्रशस्त फ्लॅट्स देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यासाठी आज भूखंड मंजूर केले. पत्रकारांना फक्त 10 हजार रुपये भरून 20 लाख ते 75 लाखांचे फ्लॅट्स मिळतील. यावर सरकार 600 कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात अशी पत्रकार हाऊसिंग स्कीम राबविली जाईल. अशी योजना राबविणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य आहे. तेलंगणात “श्रमिक” पत्रकारांना सर्व आरोग्य उपचार मोफत आहेत.