तपास अखेर सीबीआयकडे

0
778

साधनाचे संपादक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात भरदिवसा मोटार सायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ६०० पोलिसांची एसआयटी तपासात गुंतलेली असताना नऊ महिने उलटल्यानंतरही पोलिसांना आरोपी शोधण्यात यश आले नाही. जे आरोपी पकडले त्यांना पुराव्या अभावी सोडावे लागले, याकडे लक्ष वेधत कोर्टाने तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला.

पत्रकार केतन तिरोडकर यांनी दाभोलकर हत्येचा तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’मार्फत (एनआयए) करावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर यात दुरुस्ती करून त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. सीबीआयच्या वकील रिबेका गोन्साल्विस यांनी हा तपास करण्यासाठी सीबीआय मुख्यालयात गंभीरपणे विचार सुरू असल्याचे मत पूर्वी व्यक्त केले होते. परंतु, गुरुवारी अचानक घुमजाव करत त्यांनी राज्य पोलिसांवर तपासाबाबत कोणताही ठपका नसल्यामुळे हा तपास सीबीआयमार्फत करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. परंतु न्या. पी. हरदास यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळत सीबीआय तपासाचा निर्णय दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here