डीडी किसानसाठी पत्रकार हवेत

    0
    1059

    डीडी किसान टीव्ही चॅनेलची भरती प्रक्रिया सुरू, 67 जागांसाठी पहिली जाहिरात
    शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी, नव्या पद्धतीची शेती करण्याच्या दृष्टीनं दूरदर्शनवरुन खास शेतीसंदर्भात माहिती देणारी एक नवी वाहिनी केंद्र सरकार सुरु करतं आहे. डीडी किसान या नावाच्या या वाहिनीसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
    प्रोड्युसर, अँकर, व्हिडिओग्राफर, ग्राफिक डिझायनर, क्रिएटीव्ह एडिटर, सेल्स, रेकॉर्ड कीपर अशा एकुण 67 जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणाऱ्या या पदासांठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 21 नोव्हेंबरपर्यंत आहे.
    त्यामुळं, शेती विषयात रुची असणाऱ्या आणि मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी माहिती देण्याची आवड असणाऱ्यांनी या पदांसाठी अर्ज करण्यास काहीच हरकत नाही.
    उमेदवारांना स्पीड पोस्टव्दारे आपले अर्ज सहाय्यक संचालक, दूरदर्शन भवन, नवी दिल्ली यांना पाठवावे लागणार आहे. यासंबंधी विस्तृत माहितीhttp://www.ddindia.gov.in या वेबसाईटवर वाचता येईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here