टीव्हीवरील लाइव्ह शो मध्ये तलवार नाचविली

0
1089

टीव्हीवरील लाइव्ह चर्चेच्या वेळेस कोण काय बोलेल किंवा कोण काय करेल याचा जराही नेम उरलेला नाही.पद्मावती हा चित्रपट आज असा विषय बनला आहे की,त्यामुळं देशातील अन्य सारे बुनियादी विषय मागे पडले आहेत.पद्मावतीच्या बातम्या आणि चर्चेमुळं आपला टीआरपी वाढत आहे असं लक्षात आल्यानं काही चॅनलवर रतिब घालाव तशा चर्चा झडत आहेत.त्यातील पद्मावती समर्थक आणि विरोधक ज्या भाषेचा अवलंब करीत आहेत ती भाषा सभ्यतेच्या सार्‍या सीमा ओलांडणार्‍या आहेत.काही मंडळी सरळ सरळ दीपिका पादुकोन आणि संजय लिला भन्साळीला जिवे मारण्याच्या धमक्या देत असताना वाहिन्या त्यांना आपलं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.परवा तर कमालच झाली.टाइम्स नाऊवर याच विषयावर चर्चा चालू असताना करणी सेनेच्या एका प्रतिनिधीनं चक्क मॅनेतून चलवार काढली आणि ती अँकर समोर नाचविली.करणी सेनेचे हे प्रतिनिधी रंगी-बेरंगी साफा डोक्यावर घालून आले होते.संजय लिला भन्साळीची हत्त्या करणार्‍याला पाच कोटी दिले जातील अशी सुपारी थेट वाहिनीवरूनच त्यांनी दिली.एवढंच नव्हे तर अत्यंत असभ्य भाषेचाही यथेच्छ वापर केला गेला.प्रश्‍न असा आहे की,टीव्हीवरील चर्चेच्या वेळेस स्टुडिओमध्ये तलवार घेऊन यायलाच कशी परवानगी दिली गेली ़?.अशा सार्‍या प्रकारांमुळे टीव्हीवरील या चर्चांचे गांभीर्यच संपत चाललं आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here