धमक्या केवळ गावाकडच्या पत्रकारांनाच मिळतात असं नाही,झी टीव्हीचे चेअरमन डॉ.सुभाष चंद्रा यांनाही आज एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे.तशी तक्रार चंद्रा यांनी पोलिसात दिली आहे.त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हिसारला येण्याची हिंमत करू नका तुम्हाला तेथे धोका आहे असा दम फोन करणार्याने दिल्याचे चंद्रा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.भाजपच्या एका नेत्याचं नाव घेत काही व्यक्ती चंद्रा यांना नुकसान पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहेत.-