जुन्नर तालुका पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघाबरोबर

0
871

छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेल्या आणि निसर्गाचे लेण भरभरुन नेसलेल्या जुन्नर तालुक्यात काल जाण्याची संधी मिळाली.

…..निमित्त होते जुन्नर तालुका पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य यांची संयुक्त बैठक.
गेली अनेक महिन्यापासून जुन्नर तालुका पत्रकार संघ पुणे जिल्हा पत्रकार संघापासून दुरावला होता.काल मी व माझे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सहकारी जुन्नर तालुक्यातील नारायणगांव येथे पोहोचलो.मांजरीवाडी रोडवर सुमारे ५ते६ एकर परिसरात प्रगतशील शेतकरी भुजबळ यांनी नव्याने सुरु केलेल्या ‘ओसारा कृषि पर्यटन केंद्रातील आलिशान हॉल मध्ये बैठकीचे आयोजन केले होते.

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षा वनीताताई कोरे यांच्या पुढाकाराने आयोजित संयुक्त बैठकीत जुन्नर तालुक्यातील अनेक वर्तमान पत्रकाचे ज्येष्ट २९पत्रकार मोठ्या उत्सहात उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषद राज्यातील पत्रकारांसाठी  चांगले काम करीत आहे आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे काम समाधनकारक असल्याची भावना यावेळी जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अनेक पत्रकार सदस्यांनी व्यक्त केली.संघटनात्मक सकारात्मक चर्चेनंतर सर्व पत्रकार सदस्यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्यत्वाचे फॉर्म भरुन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सभासदत्व स्वीकारले.

बैठकीसाठी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल,उपाध्यक्ष,विनायक कांबळे,कोषाध्यक्षा,वनिताताई कोरे,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,विनायक गायकवाड हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष,संजय शेटे,सचिव, सचिन कांकरिया,ज्येष्ट पत्रकार दत्ता म्हसकर,दादा रोकडे,अतुल कांकरिया,भरत अवचट आदी पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण सेरकर यांनी केले तर आभार रविंद्र पाटे यांनी मानले.

*बापूसाहेब गोरे
*अध्यक्ष,पुणे जिल्हा पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here