मुंबई-रेवस आणि मुंबई -मोरा या जलमार्गावरील भाडेवाढीस महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मान्यता दिल्याने या दोन्ही मार्गावरील प्रवास आता महागला आहे.मुंबई ते रेवस या 18 सागरी मैलाच्या अंतरासाठी अगोदर 50 रूपये भाडे आाकारले जायचे.आता त्यात 15 रूपयांची वाढ केली गेल्या ने हे भाडे 65 रूपये झाले आहे.तर मुंबई -मोरा या 10 सागरी मैलासाठी पुर्वी 35 रूपये आकारले जायचे तेथे आता 10 रूपयांची वाढ केली गेली असून यापुढे 45 रूपये मोजावे लागतील.नवीन दर 1 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
या दरवाढीस ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने विरोध केला असून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या दबावाला बळी पडून मेरिटाईम बोर्डाने केलेली 30 टक्के दरवाढ सामांन्य प्रवाश्यांचे कंबरडे मोडणारी असल्याचा आरोप पॅसेंजर्स असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केला आहे.दर वाढीच्या बदल्यात प्रवाश्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत,लॉचेंस जुन्या असल्यानं त्या कधीही भर समुद्रात बंद पडतात असा आरोपही मोकल यांनी केला आहे.
मुंबई-रेवस जलमार्गामुळे अलिबाग मुंबईशी जोडले गेले असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत असतात.