जंजिरा मुक्तीचा उपेक्षित लढा

0
2107
  1. 15 ऑगस्ट 1947 रोजी  देशाला स्वातंत्र्य मिळालं.सारी संस्थानं भारतात विलिन झाली.अपवाद होता तो,जुनागड,हैदराबाद,जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये मात्र राजा हिंदु आणि बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती.जुनागड,हैदराबादच्या नबाबांना भिती अशी वाटत होती की,स्वतंत्र भारतात आपण विलिन झालो तर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळणार नाही.त्यामुळं ते पाकिस्तानशी संधान बांधून होते.आपण पाकिस्तानात विलिन व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता.जंजिऱ्याचा नबाबही याच मताचा.त्यालाही पाकिस्तानात विलिन व्हावं असंच वाटत होतं.त्यासाठी त्याचा ही खटाटोप सुरू होता.हैदराबादला पाकिस्तानात विलिन होण्याचं स्वातंत्र्य देणं जेवढं धोक्याचं होतं तेवढंच जंजिऱ्याच्या नाबाबालाही असा अधिकार देणं अखंड हिंदुस्थानच्या कल्पनेला मारक ठरणारं होतं.हे स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या जसं लक्षात आलं होतं तसंच ते भारत सरकारच्याही लक्षात आलं होतं.मात्र भारत सरकारचा प्रयत्न असा होता की,हे सामिलीकरण कोणताही रक्तपात न होता अन्य संस्थानासारखं सुरळीत व्हावं.त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते.तथापि या प्रयत्नांना हैदराबाद,जुनागड किंवा जंजिऱ्याचा नबाब दाद देत नव्हता.अखेरिस वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानावर लष्करी कारवाई करण्याचा नि र्णय धेतला.हैदराबाद संस्थानावर पोलिस ऍक्शन झाल्यानंतर निझाम  चारच दिवसात शरण आला.हैदराबाद संस्थान 17 सप्टेबरला 1948 ला स्वतंत्र झालं.म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठवाडा तेरा महिन्यांनी स्वतंत्र झाला.हैदराबादेत लष्करी कारवाई करावी लागली पण तशी वेळ जंजिऱ्यात आली नाही.स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या दबावापुढं निजामाला दबाव लागलं. अखेर र कोणाचंही रक्त न सांडताच जंजिरा संस्थान भारतात विलीन झालं.तो दिवस होता 31 जानेवारी 1948 चा.म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल साडेपाच महिन्यांनी मुरूड जंजिरा संस्थानातील  म्हणजे आजच्या मुरूड,श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील जनता स्नतंत्र झाली.दुर्दैवानं मुरूडचं स्वातंत्र्य राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मिळाल्यामुळं असेल किंवा जंजिरा संस्थान अवख्या तीन तालुक्यापुरतंच छोटं  असल्यानं असेल पण जंजिरा मुक्ती लढ्याची इतिहासानं पाहिजे तेवढी नोद घेतली नाही.थोडक्यात रक्तपात न होता मिळालेल्या या स्वातंत्र्याची तेव्हा आणि आजही सरकारी पातळीवर उपेक्षाच झाली.त्याची खंत या लढ्यातले आज हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना नक्तीच आहे.आम्हाला मानधन देऊ नका,आम्हाला सवलती देऊ नका पण किमान आम्ही स्वातंत्र्य सैनिक होतो हे तरी सराकरी पातळीवर मान्य करा असा जंजिरा मुक्ती लढ्यातील आज हयात असलेल्या काही स्वातंत्र्य सैनिकांचा आग्रह आहे .तो पूर्ण करायला काहीच हरकत नाही.सरकारला त्याकडं लक्ष ध्यायला वेळ नाही.ही खरी शोकांतिका आङे.मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे 17 सप्टेबंर रोजी मराठवाड्यात तो दिवस उत्साहात साजरा केला जातो.सार्वजिक सुटी दिली जाते.त्याच ध र्थीवर जंजिरा संस्थानातील तीन तालुक्यात किंवा रायगड जिल्हयात जंजिरा मुक्ती दिन साजरा व्हावा ही रायगडातील पत्रकारांची आणि जनतेची मागणीही पूर्ण होत नाही.या लढ्याची उपेक्षा झाल्यानं जंजिरा मुक्तीचा लढा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही माहित नाही. प्रारंभी म्हटल्याप्रमाणं जंजिरा मुक्ती लढयाचं वैशिष्टय असं आहे की,रक्त न सांडता,शासकीय हस्तक्षेपाखेरिज किंवा सरकारी मदतीशिवाय केवळ  जनतेनं  जिंकलेला हा एकमेव लढा असावा.त्यासाठी मात्र जनआंदोलनाचा रेटा वाढवत नेण्याची गरज होती.ते काम नानासाहेब पुरोहितांनी केलं.जंजिरा संस्थान स्वतंत्र भारतात विलिन व्हावं यासाठी जो लढा दिला गेला त्याचं नेतृत्व नानासाहेबंानी केलं होतं.त्यासाठी 1946 पासूनच जमवाजमव सुरू होती.हा लढा सुनियोजित पध्दतीनं पुढं नेण्यासाठी जंजिरा संस्थानातील स्वातंत्र्य प्रेमी जनतेची एक परिषद मुंबईत भरविण्यात आली होती.तिथं प्रजा परिषद नावाची संघटना स्थापन करून तिच्या नेतृत्वाखाली जंजिरा मुक्ती लढा लढण्याचं ठरविण्यात आलं.प्रजा परिषदेचं पहिलं अधिवेशन दिवेआगरला न.वि.गाडगीळाच्या अध्यक्षतेखाली भरलं.त्यानंतर नाना पुरोहितंांनी नांदवीला बैठक घेऊन पुढील कार्यक्रमाची आखणी केली.या वेळीच नाना पुरोहितांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले “आपली मोहिम मुस्लिमाच्या विरोधात नाही.व्यक्तिशाः नबाबाच्या विरोधातही नाही.मात्र सस्थानाचा पिवळा डाग कुलाबा जिल्ह्यात नको आहे तो निपटून काढायचा आहे”.नानानी उपस्थितांना प्रश्न केला तुमची हरकत नाही ना?हरकत नाही असा प्रतिसाद मिळाला.अन तिथंच ठरलं.26 जानेवारी 1948 रोजी खामगावला जमायचं.वाळंद खोरे आणि मुंबईतील काही मंडळी बरोबर घेऊन नानासाहेबांनी खामगावकडं कूच केली.प्रथम म्हसळयावर स्वारी होणार होती.ते पडलं की,श्रीवर्धन घ्यायचं असं नियोजन ठरलं होतं.28 जानेवारी रोजी नानासाहेब म्हसळ्यात गेले.तेथील मामलेदाराला भेटले.आपली भूमिका त्यांना संागितली.संस्थानातील मुस्लिम जनतेलाही नानासाहेब भेटले.त्यांच्याशी विलिनीकरणाच्या मुद्दयावर च र्चा केली.नानासाहेब अशा प्रकारे वातावरण तयार करीत असतानाच nababla  त्याची खबर लागली.स्वातंत्र्य सैनिकांना रोखन्यासाठी हजार हत्यारबंद सैनिकं निजामानं म्हसळ्याला पाठविले.आता घणघोर लढाई होणार असा सारा माहोल होता.स्वातंत्र्य सैनिकांना रक्ताचा थेंबही न सांडता हे युध्द जिंकायचं असल्यानं कोणताही आतताईपणा न करता स्वातंत्र्य सैनिकांच्यावतीनं मोहन धारिया यांना निजामाच्या सैनिकांशी च र्चा कऱण्यासाठी पाठविण्यात आलं.धारिया गेले पण त्यांना परतायला उशीर झाला.तेवढ्यात धारिया यांची ह त्या झाल्याची अफवा उठली. दृवातंत्र्यसैनिक भडकले.संतप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा हत्यारबंद मोर्चा म्हसळ्यात घुसला.तथापि स्वातंत्र्य सैनिकांचा आवेश बधून गर्भगळित झालेल्या निजामाच्या सैनिकांनी पांढरे निशाण दाखविले.मामलेदारांनीही मुकाटयानं कोषागाराच्या चाव्या आणि कागदपत्रांचा ताबा स्वातंत्र्यसैनिकांकडं दिला.म्हसळा पूर्णतः दृवातंत्र्यसैनिकांच्या ताब्यात आले.थोडक्यात म्हसळा पडले.स्वतंत्र झाले,म्हसळ्याचा कारभार स्वातंत्र्यसैनिक बघू लागले.म्हसळ्यातील या घटना शेजारीच असलेल्या श्रीवर्धनला पोहचायला वेळ लागला नाही.कवळ धाकानंच श्रीवर्धनचा मामलेदारही शरण आला.त्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी जनतेला काहीच करावं लागलं नाही.जंजिरा संस्थानचा पायाच खचला.म्हसळा आणि श्रीवर्धनवर स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्यावतीनं प्रशासक नेमला गेला.म्हसळ्याचा कारभार पाहण्यासाठी हरिभाऊ भडसावळे यांना मुख्यमंत्री नेमन्यात आले.म्हसळा 28ला पडले.श्रीवर्धन पडले ती ताऱिख होती 30 जानेवारी.दोन दिवसातच जंजिऱ्याच्या नबाबाचा खेळ खतम झाला होता.दुर्दैवानं म्हसळा-श्रीवर्धन जिंकल्याचा आनंद स्वातंत्र्यप्रेमी जनतेला साजरा करता आला नाही.श्रीवर्धनवर तिरंगा फडकविला जात असतानाच तिकडं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाल्याची बातमी आली.आनंदावर विरजन पडले.गांधीच्या हत्येच्या बातमीनं जंजिरा मुक्तीचा लढा झाकोळला गेला.त्यानंतर या अदंभूत लढ्याची कायम उपेक्षा होत गेली.जंजिरा मुक्तीचा हा लढा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे.जनआंदोलनापुढं निजामाला नतमस्तक व्हावं लागलं.मराठ्यांना जंजिरा कधीच जिंकता आला नाही.तो अजिंक्य होता असं म्हटलं जातं.पण अवध्या तीन दिवसात जनतेनं जंजिऱ्याची प्रदिर्घ अशी राजवट संपवून टाकली.जंजिरा जिंकला.खरं तर हैदराबाद प्रमाणंच जंजिऱ्याचं करायचं काय ?  असा पेच सरकार पुढं होता.प्रारंभी म्हटल्याप्रमाणं गुंता असा होता की,राजा मुस्लिम असल्यानं जंजिऱ्यावरील कोणतीही कारवाई मुस्लिम विरोधी आहे असा प्रचार जनतेत होईल अशी भिती सरकारला वाटत होती.त्यामुळंच हैदराबाद असो की.जंजिरा बाबत सरकार वेट थांबा  आणी पाहा  ची भूमिका घेऊन होते.सरकारला डोकेदुखी न होता जनआंदोलनातून जंजिरा संघराज्यात आले पण हैदराबादचा निजाम  त्यासाठी तयार नव्हता.तिकडंही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू होते.निजाम हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करीत राहिला.निजाम ऐकत नाही म्हटल्यावर वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात लष्कर धुसविले आणि चार दिवसात निजामाचा नक्षा उतरवून टाकला.तसं काही करण्याची वेळ सरकारवर जंजिऱ्यात आली नाही.हैदराबादच्या तुलनेत जंजिरा संस्थान छोटं म्हणजे जेमतेम तीन तालुक्यापुरतंच होतं.त्यामुळं या संस्थानची काळजी सरकारला वाटत नसावी.पण जंजिराचा nabab  काही अगळिक  केली असती आणि बदलत्या लोकभावनेची कदर केली नसती तर त्याला देखील पोलिस अ्रॅक्शनला तोंड द्यावं लागलं असतं हे नक्की.जंजिरा मुक्ती लढा जनतेने  लढला  पण या लढ्याचं महत्व सरकारला कळलं नाही.त्याची उपेक्षा केली गेली.या लढ्यातील सैनिकांना स्वातंत्र्यसैनिकांचा द र्जा देण्याचा मनाचा मोठेपणाही सरकारनं दाखविला नाही.31 जानेवारी हा जंजिरा मुक्ती दिन आहे.मात्र या दिवसाचं स्मरण व्हावं असा कोणताही कार्यक्रम सरकारी पातळीवर साजरा केला जात नाही.त्याचं दुःख या लढ्यातील हयात सैनिकांना नक्तीच आहे.सरकार काही करत नाही म्हटल्यावर रायगडातील पत्रकारांनी 2010साली मुरूड येथे जंजिरा मुक्ती दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला.या लढ्यातील हयात 12 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला तेव्हा त्यातील अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.आमची उपेक्षा झाल्याची खंत त्यातील बहुतेकांनी बोलून दाखविली.या संबंधिचा पत्र व्यवहार सरकार दरबारी केला गेला पण सरकार जंजिरा मुक्ती लढ्यास स्वातंत्र्य लढा समजायला तयार नाही.सरकारचा हा कृतघ्नपणाच म्हणावा लागेल.त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागेल.पण अडचण अशी आहे की,जिल्हयातील लोकप्रतिऩिधीही या विषयाबाबत मौन बाळगून असतात.हा विषय हाती धेतला तर आपल्या मुस्लिम मतावर परिणाम होईल याची साठ वर्षानंतरही त्यांंना भिती वाटते.त्यामुळंच मुरूडला जेव्हा पहिला मुक्ती दिन साजरा केला गेला तेव्हा गावात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास मुरूडच्या नगराध्यक्षांना निमंंत्रण देऊऩही त्यांनी येण्याचं धाडस दाखविलं नाही. वा स्तव अस आहे की,जंजिरा मुक्ती लढा हा मुस्लिम विरोधी लढा नव्हताच.नानासाहेबंानी तेव्हाच ते जाहिर केले होते.पण आजही या सोनेरी लढ्याला धर्माच्या बंधनात बांधून त्याची उपेक्षा करणयचा कार्यक्रम सरकार इमाने-इतबारे राबवत आहे.याची खंत वाटल्याशिवाय राहित नाही.दृवातंत्र्य सैनिकांनी म्हसळा आणि श्रीवर्धऩ तर ताब्यात घेतलं होतं पण नबाबची राजधानी ज्या मुरूडमध्ये होती ते अजून ताब्यात येणं बाकी होतं.बऱ्या बोलानं नबाब स्वतंत्र भारतात सामिल झाला नाही तर खाडी आलांडून मुरूडकडं कूच करणयाची योजना होती.तत्पुर्वीच म्हसळा आणि श्रीवर्धनवरील विजयाच्या तारा स्वातंत्र्यसैनिकांनी भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल,मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर,तसेच मुरूडच्या नबाबाला पाठविल्या.”म्हसळा,श्रीवर्धन सर,उध्या स्वारी मुरूड जंजिऱ्यावर “असा तारांमधील आशय होता.नानासाहेबांची तार पाहून गर्भगळीत झालेला मुरूडचा नबाब31 जानेवारी 1948 रोजी मुंबईला गेला.तिथं त्यांनी मुबईचे मुख्यमंत्री बाळासाहेबांची भेट घेतली.आपण सामिलनाम्यावर स्वाक्षरी करायला तयार आहोत मुरूडवरील स्वारी थांबवा अशी विनंती नबाबानं मुख्यमंत्र्यांकडं केली.बाळासाहेब खेरांनी सामिलनाम्याचा कागद समोर ठेवला.निजामानं त्यावर स्वाक्षरी केली.कोणताही रक्तपात न होता लोकलढा यशस्वी झाला.मुरूड संस्थान इतिहास जमा झालं .जंजिऱ्यावर तिरंगा डोलानं फडकायला लागला.भारतीय संधराज्यात आणखी एक संस्थान विलीन झालं.त्यासाठी सरकारला काहीच करावं लागलं नाही.,संस्थानचं अस्तित्व संपल्यावर पुढं 3-4 दिवस नानासाहैब संस्थानचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं.सस्थानाच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करण्याचं काम त्यंानी केलं.संस्थान विरोधी लढ्याच्या निमित्तानं हिंदू-मुस्लिम जातीय दंगे भडकतील अशी भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळं सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सुदैवानं तसं काही झालं नाही.सारी प्रक्रिया निर्विध्न पार पडली.नानासाहेबांनी पाच दिवसांनी आपली पंतप्रधानकीची वस्त्र 5 फेब्रूवारी 1948 रोजी तत्कालिन कलेक्टर झुबेरी यांच्याकडं सोपविली.नाना यशस्वी होऊन आपल्या गावी महाडला परतले.पैशाचाही चोख हिशोब दिला गेला.एक पैशाही इकडच्या तिकडं झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here