चॅनलच्या प्रमुखांना कोण काय भेट देऊन खूष करेल याचा नेम नाही.एका वाहिनीचे प्रमुख असे आहेत की,त्यांना भेट म्हणून चक्क एक मुलगी,एक गाय आणि तिचे कोकरू मिळाले.
अर्थात घटना भारतातली नाही.ती दक्षिण आफ्रिकेतली .साऊथ आफ्रिकन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन चे कार्यकारी प्रमुख हलाऊदी मोत्सोएनेंग यांना हा अजब नजराणा मिळाला आहे.एका स्थानिक कबिल्याच्या प्रमुखाने ही अनोखी भेट दिली आहे.महिला संघटनांनी याविरोधात आता आवाज उठवत रस्त्यावर उतरायला सुूरूवात केलीय.त्यानंतर या प्रकऱणाची चौकशी सुरू झाली आहे.आम्हाला या प्रकरणी अनेक तक्रारी मिळाल्या असून आरोपीची चौकशी केली जाईल असं सरकार्चाय प्रवक्त्यांनं सांगितलं.
सोवेतान नावाच्या स्थानिक वृत्तपत्राने मागचय आठवड्यात ही बातमी छापली होती.या बातमीनुसार लिंपोपा विभागात थोहोयांदाऊ येथे ही घटना घडली.वेंदा कबिल्याच्या प्रमुखाने 10 तरूण मुलींना एका रागेत उभे करून मोत्सोएनेंगा यांना यातून एकीची निवड करा असे सांगितले.त्यानी 22 वर्षाच्या एका मुलीची निवड केली.ही मुलगी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अभ्यास करतेय.बातमीमध्ये असेही म्हटले आहे की,निवडली गेलेल्या मुलीने नंतर मोत्सोंएनेंगा यांच्या बरोबर छायाचित्रही काढले.