निवडणुकीनंतर बघून घेतोची भाषा
पत्रकार हलला विरोधी कृती समितीतर्फे निषेध
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना खरं तर राजकीय नेत्यांनी आपल्या जिभेला लगाम लावायला हवा मात्र औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना त्याचे भान राहिले नाही.त्याच्या विरोधात बातम्या देणा़ऱ्यांना मी निवडणुकांनंतर बघून घेतो अशी जाहीर धमकी दिली आहे.चंद्रकांत खैरे यांच्या धमकीने औरंगाबादेतील पत्रकारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मागे अैारंगाबादेत झालेल्या एका कार्यक्रमात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे पाय पकडले होते.त्याच्या बातम्या आणि छायाचित्रे तेव्हा सर्वत्र प्रसिद्ध झाली होती.वाहिन्यांवरूनही दिवसभर त्याची चर्चा होत राहिली.हे पाहून तेव्हाही खैरे यांनी माध्यमांवर जोरदार आगपाखड केली होती.तेवढ्याने खैरे यांचे समाधान झाले नाही.आता खैरे पुन्हा माध्यमांवर भडकले असून निवडणुकांनंतर मी विरोधात बातम्या देणाऱ्यांना बघून घेतो अशी धमकीच दिली आहे.
शिवसेनेचा एक मेळावा काल औरंगबादेत झाला.या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कऱण्याऐवजी चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांनाच लक्ष्य केले.समोर बसलेल्या इलेक्टॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीचा आणि छायाचित्रकारांचा नामोोल्लेख करीत त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.मी दिल्लीत झोपा काढत नाही,मी केलेल्या कामाची जंत्री वाचली तर एक पुस्तकच तयार होईल मी खूप काम केले आहे.असे असतानाही पेपरवाले खैरे यांनी काय काम केले असे प्रश्न विचारतात असे सांगून खैरे म्हणाले,तुम्ही कितीही खोट्या बातम्या छापा आमचे नेटवर्क जबरदस्त आहे.त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यत पोहोचणार आहोत.असेही स्पष्ट करीत त्यांनी माध्यमांमुळे माझे काही अडत नाही हेच अप्रत्येक्षपणे स्पष्ट केले.
ते म्हणाले,65 साल के सांसदने 23 साल के युना नेता के पैर पकडे असे मथळे देत त्याचा बाऊ केला गेला.युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणाला प्रसिध्दी देण्याऐवजी हीच बातमी दिवसभर दाखविली गेली.मी बोललो तर त्याची बातमीही दाखविली गेली,पण मी योग्य वेळी उत्तर देईन आदित्य ठाकरे यांच्या पायापडतानाचा फोटो काढणारा फोटोग्राफरही येथे आहे.मी निवडणुकीनंतर त्याच्याकडे बघणार आहे अशी जाहीर धमकी त्यांनी दिली.एबीपी माझाचे प्रतिनिधी केंडे यांचे नाव घेऊनही त्यांनी धमकी दिली.खैरे यांनी माध्मयााना टार्गेट केल्याने व्यासपीठावरील सुभाष ठाकरे यांच्यासह सारेच अस्वस्थ झाले.
पत्रकार हल्ला विरोधा कृती समिती चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहे.