खरी परीक्षा नारायण राणे,रामदास कदम,अनंत गीते आणि विवेक पाटलांचीच .

0
1347

रायगड-रत्नागिरी- मावळ लोकसभा  मत दार संघ

   2008मध्ये देशातील लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना केली गेली.2009मध्ये पंधराव्या लोकसभेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्या पुनर्रचित मतदार संघानुसार.पुनर्रचना होताना अनेक मतदार संघ इतिहास जमा झाले.अनेकांचं आकारमान बदललं.अनेक नव्यानं निर्माण झाले.कोकणातही असंच झालं.मध्य कोकण आणि तळ कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हयासाठी 2008 पूर्वी  तीन लोकसभा मतदार संघ होते.कुलाबा,रत्नागिरी आणि राजापूर हे ते तीन मत दारसंघ.कुलाब्यातले महाड-पोलादपूर हे रत्नागिरीला जोडलेले होते. रत्नागिरीचे काही विधानसभा मतदार संघ राजापूरला जोडले गेलेले होते.आता सारी उलथापालथ झालीय.कुलाबा लोकसभा मतदार संघ इतिहास जमा झालाय.त्याऐवजी रायगड हा नवा मत दारसंघ अस्तित्वात आलाय.तिकडे राजापूर मतदार संघही राहिला नाही.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा नवा मतदार संघ अस्तित्वात आलाय.या पुनर्रचनेत जिल्हयाची म्हणून जी अस्मिता असते ती राहिली नाही.रायगडचे जिल्हयाचे विभाजन दोन मतदाार संघात झालं.रायगडमधील पनवेल,उरण आणि कर्जत हे उत्तरेकडील विधानसभा मतदार संघ नव्यानं निर्माण झालेल्या मावळला जोडले गेले. – मावळ,पिंपरी आणि चिंचवड हे पुणे जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघ  आणि कोकणातील तीन मत दार संघ असा हा मावळ मत दार संघ झाला.कोकणला घाटाशी जोडण्याचा हा प्रयत्न कोणालाच मानवला नाही.कारण मावळचे प्रश्न वेगळे आहेत,कोकणचे प्रश्न वेगळे आहेत.दोन्हीकडच्या मत दारांची परिस्थिती,मानसिकता सारं काही वेगळं आहे.तरीही ते झालं.2009च्या निवडणुका नव्या रचनेप्रमाणेच लढविल्या गेल्या आणि त्यात शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर विजयी झाले.इकडं रायगडची निर्मिती करताना त्याला रायगडमधील अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड हे चार विधानसभा मत दार संघ आणि रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ जोडले गेल.येथून शिवसेनेचे अनंत गीते निवडून आले.त्यांनी कॉग्रेसच्या बॅ.अ.र.अंतुले यांचा पराभव केला.तळ कोकणातील राजापूर मत दार संघाच्या ऐवजी जो रत्नागिरी – सिंधुदुर्ग मत दार संघ निर्माण झाला .त्यात रत्नागिरीतील चिपळूण,रत्नागिरी,आणि राजापूर या तीन विधानसभा मत दार संघाचा आणि सिंधुदुर्गमधील कणकवली,कुडाळ,आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मत दार संघाचा समावेश केला गेला.मावळ,रायगड सेनेने घेतला.रत्नागिरीवर कॉग्रेसने जय मिळविला.आता अशीच लढाई पुन्हा होत आहे.नव्यानं तयार झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मत दार संघातील 6,91.937 स्त्रिया आणि 6,55928 पुरूष मत दार असे मिळून 13,47,846 मत दार आपला प्रतिनिधी निवडणार आहेत.रायगडमधील   १5,13,608  मत दार आपला प्रतिनिधी निवडतील.यातील गुहागारमधील२,२१,३९४  तर 254868 दापोलीतील मतदार आहेत.

  राजकीय पार्श्वभूमी

 – पूर्वीच्या राजापूर आणि रत्नागिरी मतुदार  संघाचा विचार करायचा तर या दोन्ही मतदार संघावर पहिली काही वर्षे समाजवादी विचारांच्या नेत्यांचा पगडा असल्याचं आपणास दिसेल.राजापूरमधून
1957 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर नाथ पै कॉग्रेसचे मोरेश्वर जोशी यांचा एक लाखांवर मतांनी पराभव करून निवडून आले होते.1962 मध्ये पुन्हा नाथ पै विजयी झाले पण त्यांचं मताधिक्य यावेळेस कमी झालं होतं.1967मध्ये पुन्हा नाथ पै दणदणीत मतांनी विजयी झाले.1971च्या निवडणुकीत नाथ पै याच्या ऐवजी मधु दंडवते राजापूर मतदार संघातून प्रजा समाजवादी पक्षातर्फे उभे राहिले आणि ते सलग पाच वेळा विजयी झाले. 1971,1977,1980,1984,आणि 1989 असे सलग पाच वेळा मधू दंडवते  प्रारंभी प्रजा समाजवादी आणि नंतर जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले.1991 मध्ये मात्र त्यांना कॉग्रेसच्या सुधीर सावंताकडून पराभव पत्करावा लागला.मधु दंडवतेंसारखा सच्चा समाजवादी 91च्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला.दुसऱ्या स्थानावर राहिले शिवसेनेेचे वामनराव महाडिक.महाडिकांना मिळालेली 1लाख 14 हजार मतं शिवसेनेच्या काकणातील उदयाची नादी होती.कारण नंतर 1996,1998,1999,आणि 2004मध्ये सलग चार वेळा शिवसेनेचे सुरेश प्रभू तेथून निवडून आले.1996 आणि 1999मध्ये पुन्हा मधु दंडवते उभे राहिले पण ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल.समाजवादी चळवळ कोकणातून हद्दपार झाली होती त्याची जागा शिवसेनेच्या भगव्या झंझावातानं घेतली होती.

– रत्नागिरी मत दार संघातलं चित्र यापेक्षा वेगळं नव्हतं.1977 आणि 1980 मध्ये बापूसाहेब परुळेकर हे समाजवादी नेते सलग दोन वेळा विजयी झाले होते.1984मध्ये त्यांना हॅटट्रीक करण्यापासून रोखलं ते कॉग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी.त्यानंतर 1989 आणि 1991 असे दोन वेळा गोविंदराव निकम कॉग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले.1989 ला गोविंदराव निकम विजयी झाले पण त्यावेळेस भाजपचे श्रीधर नातू यांना 2,22,271 मतं पडली होती.ही देखील रत्नागिरीचे वारे कोणत्या दिशनं वाहतंय याची नांदी होती.1991मध्ये निकमांचा शिवसेनेच्या अनंत गीतेंच्या  विरोधात अवघ्या बारा-तेरा हजार मतांनी विजय झाला होता.त्यानंतर 1996,1998,1999,आणि 2004 असे सलग चार वेळा शिवसेनेचे अनंत गीते चांगल्या फरकानं विजय संपादित करत राहिले.या काळात समाजवादी पक्षाला आपला उमेदवारही उभा करता आलेला नाही याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.डावी चळवळ तळ कोकणातून संपलीच होती.

– तळ कोकणात समाजवाद्याचा प्रभाव होता तर मध्य कोकणात म्हणजे रायगडात शेकापचा लालबावटा जोमात होता.अलिबाग,पेण,पनवेल हे शेकापचे बालेकिल्ले होते.2009पर्यत पनवेल विधानसभेची जागा शेकापने सलग बारा वेळा जिंकली होती.लोकसभेतही 1952 ते 1989 पर्यत झालेल्या 9 निवडणुकात एकदा कॉग्रेस तर नंतर शेकापने  जिकल्याचा इतिहास आहे.1989मध्ये  अ.र.अंतुले विजयी झाले आणि त्यांनी ही परंपरा खंडित केली.ते 1989,1991,आणि1996 असे सलग तीन वेळा निवडून आले.1989 मध्ये त्यांनी दि.बा.पाटलांचा 1,15,434 मतांनी पराभव केला होता.नंतरच्या काळात त्यांना हे मताधिक्या टिकविता आलं नाही.1991मध्ये शेकापच्या दत्ता पाटलांच्या विरोधात त्यांना केवळ 39,706 मतंच जास्त पडली.यावेळेस शिवसेनेने सतीश प्रधान यांना उमेदवारी दिली होती.ते आयात केलेले उमेदवार होते तरी त्यांना 96,880 मतं पडली होती आणि नामसाधर्म्य असलेल्या दत्ता पाटलांना 15,645 मतं मिळाली होती.राजापूर आणि रत्नागिरीप्रमाणंच इ थंही शिवसेना वाढू लागली होती असं दिसून येईल.शिवसेनेच्या भगव्या झंझावातानं रायगडातील डावी चळवळ उखडून फेकत जिल्हयात पाय रोवले आहेत हे 1996 च्या निवडणुकीत दिसून आलं.शिवसेनेनं अऩंत तरे या बाहेरच्या नेत्याला उमेदवारी दिली तरी त्यांनी 2,09,180 एवढी प्रचंड मतं मिळविली.दत्ता पाटलांची मतं जवळपास तेवढीच राहिली.1991मध्ये शेकापच्या दत्ता पाटलांना 1,79,933 मतं मिळाली होती.1996 मध्ये 1,84,664 मतं त्यांना मिळाली.अंतुलेंची मतं काही प्रमाणात का होईना कमी झाली.अंतुलेंना 1991 मध्ये 2,19,639 मतं मिळाली होती,ती 1996मध्ये 2,13,187 पर्यत कमी झाली आणि अंतुलेंचा निसटता म्हणजे अवघ्या 4007 मतांनी विजय झाला.हा निकाल लागल्यावर चिडलेले अंतुले विजयी मिरवणुकीसाठी देखील थांबले नाहीत.कार्यकर्त्याचा उद्दार करीत ते मुंबईकडं निघुन गेलेे.मात्र 1996 मध्ये ते किमान जिंकले तरी नंतरच्या म्हणजे 1998च्या  निवडणुकीत शेकापमध्ये नव्यानंच दाखल झालेल्या रामशेठ ठाकूर यांनी पराभव केला.या निवडणुकीत शेकाप मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तीन वरून एक क्रमांकावर गेला.शिवसेनेची 2 लाख 8 हजार मतं कायम राहिली तरी अनंत तरे तिसऱ्या स्थानावर गेले.रामशेठला मिळालेल्या  मतांमध्ये शेकापची मतं आणि त्यांच्या व्यक्तीगत  करिष्यामुळं मिळालेल्या मतांचा समावेश होता.1999मध्ये शेकापचे रामशेठ ठाकूर  पुन्हा विजयी झाले.यावेळेस त्यांची लढाई आपल्या गुरूबरोबरच होती. शेकापवर नाराज होऊन शिवसेनेत गेलेल्या दि.बा.पाटील या गुरू शिष्यात ही  लढाई झाली.त्यात शिष्यानं गुरूवर 43 हजार 97 मतांनी विजय मिळविला.या निवडणुकीत अंतुले पराभवाच्या भितीने औरंगाबादला गेले.तिकडेही ते पराभूत झाले.कॉग्रेसने मग पुष्पा साबळे या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी दिली तरी त्यांना 1 लाख 48 हजार 146 मतं मिळाली.याचा अथ र् रायगडमध्ये शेकाप आणि शिवसेनेप्रमाणेच कॉग्रसेची देखील कमिटेड मतं आङेत.याचा अ र्थ असा लावता येईल की,राजापूर आणि रत्नागिरीत जो भगवा झंझावात तेथील विरोधकांना रोखता आला नाही तो रायगडात शेकाप आणि कॉग्रेसनं रोखून धरला.2004मध्ये हे स्पष्ट झालं.2004 ची निवडणुकीत पुन्हा अंतुले मैदानात उ तरले आणि शेकापच्या विवेक पाटलांवर 31,870 मतांनी मात करीत मागच्या पराभवाचे उट्टे काढले.शिवसेनेच्या मतांमध्ये जवळपास 70 हजारांची घट झाली.याला शिवसेनेने सातत्यानं बदललेले उमेदवारही कारणीभूत आहेत असं म्हणता येईल.मतदार संघाची पुनर्रचना होईस्तोवर शिवसेनेला रायगडात लोकसभेत विजय संपादन करता आलेला नाही.याचं श्रेय नक्कीच जिल्हयात रूजलेल्या शेकापला देता येईल.मात्र2009मध्ये शेकापच्या संधीसाधू राजकारणात शिवसेनेला रायगडवर भगवा फडकवता आला.याची नोंद इतिहासानं घेतली आहे.

 मत दार संघ पुनर्रचनेनंत

– हा सारा इतिहास मतदार संंघ पुनर्रचनेपुर्वीचा.2008 मध्ये नवे मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर 2009मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका झाल्या.यावेळेस तळ कोकणात एक महत्वाचा बदल झाला होता.शिवसेनेचे नेते नारायण राणे यांनी पक्षांतर करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश के ला होता.शिवसेनेत उभी फूट पडली होती.नारायण राणे यांच्या दहशतीपुढे शिवसेनेचे सारे स्थानिक कार्यकर्ते गर्भगळीत झाले होते.लोकसभेपूर्वी झालेली कुडाळ- कणकवली विधानसभेची पोटनिवडणूक नारायण राणे यांनी एकहाती जिंकली होती.त्यामुळं लोकसभेवरील सेनेचे वर्चस्व संपुष्टात आणणे नारायण राणे यांच्यासाठी आवश्यक होते.त्यांनी त्यासाठी निलेश राणे यांना उमेदवारी दिली.शिवसेनेने पुन्हा एकदा सुरेश प्रभू यांनाच मैदानात उतरविले.मात्र मवाळ प्रवृत्तीचे प्रभू राणेंचा मुकाबला करू शकले नाहीत..चार वेळा खासदार राहिलेल्या प्रभूंचा नवख्या निलेश राणे यांनी 46,750 मतांनी पराभव केला.या निवडणुकीत कॉग्रेस आणि  राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेला धूळ चारायची या इर्षेनं जोमानं काम केल.त्याचा परिणाम निलेश राणे यांच्या विजयात झाला.अशी च र्चा तेव्हा होती की,ज्या विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते विजयी झाले ,तेथे त्यांना जे मताधिक्य  मिळाले होते ते मार्जिन लोकसभेच्या वेळेस तर मिळाले नाहीतच उलट शिवसेनेच्या आमदारांना जी मतं पडली त्यापेक्षा कमी मतं सुरेश प्रभू यांना पडली.असं का झालं? याचा शोध नंतर सेना नेतृत्वांनं घेतला.त्यामुळंच 2014च्या निवडणुकांना सामोरं जाताना आमदारांना आपल्या मतदार संघात जे मताधिक्य मिळालं ते शिवसेनेचे विनायक राऊत यांना मिळालं नाही तर अशा आमदारांना शिवसेनेची विधानसभेची तिकीटं दिली जाणार नाहीत असा दमच सेना नेतृत्वांन दिलाय.त्यामुळं शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्गात जोमानं कामाला लागलीय.यावेळेस निलेश राणे विरूध्द शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात सामना

होणार आहे.विनायक राऊत शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आहेत.ते मुंबईत वास्तव्य करून  असले तरी त्यााचा चांगला संपर्क कोकणात आहे.शिवाय राणे स्टाईलने प्रचार करण्यात,यंत्रणा राबविण्यात विनायक राऊत कुठंही कमी पडणार नाहीत असंही बोललं जातंय.मागच्या वेळेस निलेश राणेंची पाटी कोरी होती.मात्र गेल्या पाच वर्षात जगबुडीतून बरंच पाणी वाहून गेलेल असल्यानं नारायण राणेंना मोठी झुंज द्यावी लागणार आहे.नारायण राणे यांचे मंत्रिपद आणि निलेश राणे यांची खासदारकीचा वापर करून राणे कुटुंबियांनी तळ कोकणातून शिवसेनेच्या विरोधात जश्या कारवाया केल्या तशाच त्या राष्ट्रवादीच्याही विरोधात केल्या.राष्ट्रवादीेचे काही मोहरे राणेंच्या गळाला लागले.शिवाय संधी मिळेल ति थं राणेंनी राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.आम्ही नारायण राणे यांना मदत करणार नाहीत ही त्यांची भूमिका आहे.पालकमंत्री उदय सावंत यांनी जेव्हा कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा  एवढाच कॉग्रेसचा पुळका असेल तर राष्ट्रवादी पक्षच कॉग्रेसमध्ये विलीन करून टाका अशी संतप्त सूचनाचा कार्यकर्त्यांनी नेत्यांना केली आहे.

निवडणुकांच्या अगोदरही नारायण राणे राष्ट्रवादीबद्दल तुच्छतेनं बोलायचे.राष्ट्रवादी जिल्हयात आहेच कुठं? असा सवाल ते वारंवार करायचे.यामुळंही राष्ट्रवादीत नाराजी आहे.आम्हाला सिंधुदुर्गात मदत क रणार नसाल तर राज्यात अन्यत्र कॉग्रेस तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार नाही असा दम नारायण राणे राष्ट्रवादीला देत असल्यानं ंआगीत तेल टाकल्यासारखं होत आहे.या सगळ्या राजकारणाला पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिगत राग-लोभाची किनार असल्यानं हा तिढा सोडवणे अवघड आहे.याचा फटका निलेश राणे यांना बसू शकतो.2009 मध्ये जशी सेनेला संपवायचेच अशी भावना विरोधी कार्यकर्त्यांत  होती तशीच आता राणे कुटुबियांची अरेरावी थांबवायचीच अशी जनभावना दिसून येत असल्यानं राणे कुटुबियांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे.त्यामुळंच राणे कुटुंबिय सध्या संगमेश्वर,राजापूर,रत्नागिरी परिसराच्या वाऱ्या करीत आहे.या ठिकाणाहून गेल्यावेळेस त्यांना बऱ्या पैकी मताधिक्य मिळालं होतं.मात्र त्याचा फारसा उपयोग होईल अशी शक्यता नाही.याचं कारण असं की,राणे राष्ट्रवादीची जिल्हयात ताकद नाही असं म्हणत असले तरी मतदार संघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत.रत्नागिरीतून उदय सामंत आणि सावंतवाडीतून दीपक केसरकर हे ते दोन आमदार.रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आहेत.अनेक नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीकडं आहेत.त्यामुळं राष्ट्रवादीची नाराजी किमान एक लाख मतांचं राणेंचं नुकसान करू शकते.निलेश राणेंचं गेल्यावेळेसचं 46 हजारांचं मताधिक्य विचारात घेता हा एक लाखाचा फटका राणेंना भारी जड जाणारा आहे.लोकसभा मत दार संघात केवळ कुडाळचा एकमेव विधानसभा मत दार संघ नारायण राणे आणि कॉग्रेसकडं आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादीची नाराजी किती राणेंची आजची डोकेदुखी ठरलीय. ऊरिष्ठ पातळीवरून काहीही सूचना आल्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.इतरांचं सोडाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव  देखील े अजून राणेंच्या प्रचारासाठी फिरकेलेले नाहीत.जाधव आणि राणे यांचा छत्तीसचा आकडा जगजाहीर आहे.उदय सामंत यांच्याशीही भास्कर जाधव यांचे पक्षांतर्गत वाद आहेत.ही वादावादी राणेंना भोवणार आहे.

नारायण राणे यांच्यासमोर केवळ राष्ट्रवादी हीच अडचण नाही.पक्षांतर्गत राजकारणही त्याच्या मुळावर येऊ शकते.निलेश राणे यांचा उमेदवारी अ र्ज भरताना एकही राज्य पातळीवरचा पक्षाचा नेता उपस्थित नव्हता.पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अनेक नेत्यांचे उमेदवारी अ र्ज भरताना उपस्थित होते.ते कोकणात गेलेले नाही.प्रचारासाठीही कॉंग्रेसचा  अजून तरी एकही मोठा नेता आलेला नाही.याचा काय तो संदेश  मतदारांमध्ये जातो आहे.नारायण राणेंना ही निवडणूक एकाकी लढावी लागत असल्याचं चित्र दिसतंय.या राजकीय परिस्थितीसोबतच राणे कुटुंबाच्या  वागण्या -बोलण्याचाही परिणाम होताना दिसतो आहे.साऱ्यांचाच उध्दटपणा लोकांना मान्य नाही.विनायक राऊत यांनी होळीच्या दिवशी पालखी नाचवली तर त्यावरची निलेश राणे यांची प्रतिक्रिया अशी होती की,ही पालखी घेऊन विनायक राऊतांना मुंबईला पाठवू.हे विधान छापून आलंय आणि त्यामुळं जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचंही बोललं जातंय

नारायण राणे कुटुंबियांसमोरच्या या साऱ्या अडचणींचा योग्य तो लाभ शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना होताना दिसतो आहे.त्यातच विनायक राऊत यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट अशी की,तिकडं शिवसेनेत कोणतेही वाद नाहीत.रायगडात रामदास कदम अनत गीतेंना अपशकून करताहेत पण रत्नागिरीत सारे शिवसैनिक राणेंना धडा दाखवायचाच या इर्षेने कामाला लागले आहेत.त्यांना भाजपचीही चांगली साथ मिळताना दिसते आहे.चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण,राजापूरचे सेना आमदार राजन साळवी,कणकवलीचे   भाजपचे आमदार प्रमोद जठार हे तीन विधानसभा मत दार संघ युतीच्या ताब्यात आहेत.हे सारे आमदार कामाला लागलेले आहेत.या  ठिकाणी राऊतांना मत ंकमी पडली तर विधानसभेचं तिकिट दिले जाणार नाही असं धोरणच शिवसेनंनं त्यांच्यासमोर माडल्यानं े ही सारी मंडळी नेटानं प्रचारात भाग घेताना दिसते.वरील सारे स्थिती बघ ता मागच्या पराभवापासून शिवसेनेने चांगलाच धडा घेतला असून ती बऱ्यापैकी सावरली आहे असं म्हणायला जागा आहे.चार वेळा खासदार राहिलेले सुरेश प्रभू यांचं तिकीट कापलं गेल्यानं त्यांची नाराजी असू शकते.पण त्यांचा स्वभाव बर्घींा त्यांनी प्रचारात भाग घेतला नाही तरी ते रामदास कदमांसारखी उघड नाराजी व्यक्त करतील किंवा बंड करतील अशी अजिबात शक्यता नाही.रत्नागिरी-सिंधुदुर्गात आम आदमी पार्टीने अगोदर जाहीर केलेला उमेदवार बदललाय.आता पत्रकार अभिजित हेगशेट्ये आपच्या तिकीटावर उभे आहेत.पत्रकार म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असले तरी आपचे उमेदवार म्हणून  त्यांचा कुठेच प्रभाव जाणवरणार नाही.ते स्पर्धेतही नसतील अशीच स्थिती आहे.

– रायगडचा तिढा

नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गात जो त्रास राष्ट्रवादीकडून होतोय तसा त्रास रायगडात कॉग्रेसकडून  राष्ट्रवादीला होताना दिसत नाही,गुहागरमध्ये क ॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष अब्बास कारभारी यांनी सुनील तटकरेंना पाठिंबा जाहीर केलाय.तो कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता दिला गेलाय अशी कार्यकर्त्यांची तक्रार असल्यानं ते नाराज आहेत.मात्र या नाराजीची तीव्रता सिंधुदुर्गातल्या राष्ट्रवादीतल्या नाराजी सारखी नाही.तटकरे ती नाराजी दूर करतील.राहिला प्रश्न अ.र.अंतुले यांच्या नाराजीचा.अंतुले हे सुनील तटकरे यांच्यावर नेहमीच रुसतात.2004मध्ये आणि2009मध्येही रूसवा -फुगवी झाली होती.टकमक टोक दाखविण्याची भाषाही तटकरेंच्या बाबतीत अंतुलेंनी वापरली होती.मात्र हा राग कशासाठी असतो आणि तो दूर कसा करायचा हे चाणाक्ष तटकरेंनाबरोबर माहिती आहे.2004 आणि 2009च्या निवडणुकात अंतुलेंची सारी निवडणूक यंत्रणा तटकरेच राबवत होते.तेव्हा सुनील तटकरेंचे सारे उद्योग  अंतुलेंना चालले आता त्यांच्यावर तोंडसुख घेत आहेत.समजा रायगडचे कॉग्रेसचे तिकीट मुश्ताक अंतुलेंना मिळाले असते तर आज ज्या भाषेत अंतुले तटकरेंवर टीका करीत आहेत त्यापध्दतीनं त्यांनी ती केली असती काय?  उत्तर नक्कीच नाही असं आहे.म्हणजे या टीकेला केवळ व्यक्तीगत स्वार्थाची,अंहकाराची  किनार असल्यानं रायगडची जनता अंतुलेंच्या नाराजीकडं फारशी गंभीरपणे पाहताना दिसत नाही.

 जिल्हयातील कॉग्रेसचे नेते सर्वश्री माणिक जगताप,मधुकर ठाकूर,रवीशेठ पाटील,आ.प्रशांत ठाकूर,रामशेठ ठाकूर हे अंतुलेच्या भूमिकेची पर्वा न करता सुनील तटक रेंचा प्रचार करताना दिसतात.यामागं त्यांचं व्यक्तीगत राजकारण आहे.सुनील तटकरेंचा जिल्हयातील ताकद बघता आगामी विधानसभेसाठी महाडमधून माणिक जगताप यांना,अलिबागमध्ये मधू ठाकूर यांना,पेणमध्ये रवी पाटील यांना आणि पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांना तटकरेंची मदत लागणार असल्यानं त्यांना लोकसभेसाठी तटकरेंना मदत कऱणे भागच आहे.माणिक जगताप असतील किंवा रवी पाटील असतील यांचा मागच्या विधासभा निवडणुकीत जो पराभव झाला तो सुनील तटकरे यांच्या कुटनीतीमुळेच असा आरोप हे दोन्ही नेते करीत असतात.मागील खेपेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांना मदत कऱणे हे वरील सर्वांसाठीच आवश्यक आहे.राहिला प्रश्न राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या तटकरे विरोधाचा.ते द गा- फटका करतील अशी शक्यता दोन कारणांसाठी नाही.पहिली गोष्ट जाधव हे तटकरेंच्याच मत दार संघातले असल्याने तटकरे पराभूत झाले तर त्याचे खापर जाधव यांच्यामाथी  फुटेल, प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या नेत्याला आपला मत दार संघही सांभाळता येत नाही अशा टिकेचे ते धू नी होतील  आणि पक्षातही त्यंाचे पख छाटण्याचं काम सुरू होईल.जाधव यांना हे सारं माहित असल्यानं व्यक्तीगत राग-लोभ बाजुला ठेवत  ते तटकरेंना मदत करणार हे नक्की.शिवाय तटकरेंमुळे नाही म्हटले तरी जाधवांची अडचण होतेय.तटकरे दिल्लीत गेले आणि महाराष्ट्रात पुन्हा आघाडीचं सरकार आले तर भास्कर जाधवाना लाल दिवा मिळू शकतो असे किमान त्यांना वाटत असल्यानं ते तटकरेंना अपशकून करणार नाहीत.शेकापची भूमिकाही सुनील तटकरेंना पूरक ठरते आहे.मतदार संघात शेकापची दीड लाख मतं आहेत.तेवढंच मताधिक्य गेल्या वेळेस अनंत गीते याना मिळालं होतं.ती मतं आता गीतेंना मिळणार नाहीत.गेल्या वेळेस अंतुलेंना 2,67,025 मतं मिळाली होती.मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर गेल्यावेळेस कॉग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून उभे होते.त्यांना 39,159 मतं मिळाली होती. – या दोन्ही मतांची बेरीज 306,184 होते.गीतेंना 4,13546 मतं मिळाली होती.त्यातून शेकापची 150.000 मतं वजा केली तर ते 263546 वर येतात.यात शंभर टक्के शेकापची मतं फिरणार नाहीत हे गृहित धरलं  तरी तेवढाच एक फॅक्टर नाही.रामदास कदम यांची खेड परिसरात 30-40 हजार मतं आहेत.त्यातील पन्नास टक्के मतं मिळाली नाहीत तरी गीते अडचणीत येतात.रामदास कदम यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्यानं संभ्रम आहे पण त्याची मत जर राष्ट्रवादी किंवा शेकापकडं फिरली तर गीतेसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.रामदास कदमांची अवस्था विचित्र झालेली आहे.मतदार संघ पुनर्रचनेत त्यांचा खेड मत दार संघ इतिहास जमा झाला.त्यांना शिवसेनेकडून गुहागरमधून लढायचे होते पण गुहागर हा युतीत भाजपच्या वाट्याला आलेला मत दार संघ आहे.तरीही उध्दव ठाकरे यांनी हा मत दार संघ भाजपकडून घेत रामदास कदम याना तेथून उमेदवारी दिली.त्यामुळे चिडलेल्या विनय नातू यांनी भाजपचा त्याग केला.त्यांनी युतीचा प्रचारही केला नाही असं म्हणतात.मत दार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी अ खेर कदमांना भोवली आणि ते भास्कर जाधवांच्या विरोधात तेथून पराभूत झाले.बचेंगे तो और भी लढेंगे या न्यायाने त्यांनी पुन्हा गुहागरमधून निवडणूक लढविली असती पण आता नातू परत भाजपमध्ये आले आहेत त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत भाजप ही हमखास मिळणारी जागा आता सेनेला देणार नाही.त्यामुळं राजकीयदृष्टया विस्थापित झालेले कदम नाराज आहेत.राष्ट्रवादीत गेलो तरी भास्कर जाधव गुहागर सोडणार नाहीत,कॉग्रेसमध्ये गेलो तरी गुहागरचे तिकीट आघाडीच्या राजकारणात मिळणार नाही.मनसे तेथून निवडून येण्याची शक्यता नाही.त्यामुळं त्यांचा गोंधळ झालेला आहे.आपल्या या अवस्थेला आणि मागच्या पराभवाला काही प्रमाणात गीते करणीभूत आहेत असा रामदासजींचा आक्षेप असल्यानं ते गीतेंच्या प्रचारात नाहीत.त्याची भूमिका काय असेल हे जेव्हा समोर येईल तेव्हा यावर विस्तारानं भाष्य करता येईल. – आज नातू मात्र जोमानं कामाला लागले आहेत.याचं कारण विधानसभेसाठी त्यांना कदमांची नाही तर गीतेंची मदत होणार आहे.त्यासाठी गीतेंना मत दार संघातून मताधिक्या िमिळवून देणं आणि गीतेंना निवडून आणण्यात त्यांचा स्वार्थ आहे.त्यादृष्टीन त्यांची कोशीस  असेल पण गुहागरमध्ये गीतेंना मताधिक्कय मिळणं ही भास्कर जाधवांसाठी धोक्याची घंटा असल्यानं ते अस होऊ देणार नाहीत. त्यामुळं शेकापची भूमिका आणि रामदास कदम यांचं बंड यामुळं जी अवस्था रत्नागिरीत नारायण राणे यांची झालीय तीच अवस्था रायगडात सलग पाच वेळा जिंकलेल्या ़अनंत गीते यांची झाली आहे.ही कोंडी त्यांना फोडता येईल असे दिसत नाही.

  शेकापचं काय होणार
– मावळ आणि रायगड अशा दोन्ही ठिकाणी शेकापनं उमेदवार उभे केलेत.रमेश कदम हे मागच्या खेपेला चिपळून विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे होते.तेथे त्यानी शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांच्याकडून मार खाल्ला.आता ते शेकापकडून रायगडात उभे आहेत.रायगडात त्यांना कोणी ओळखत नाही.त्यामुळं शेकापची दीड लाख मतं त्यांना मिळतील का याबद्दल साशंकता आहे.अंतुलेचें आशीर्वाद,राज ठाकरेंचे टार्गेट सेना अभियान हे फॅक्टर गृहित धरले तरी रमेश कदम 2 लाखाचा टप्पा पार करू शकत नाहीत.तिकडे लक्ष्मण जगताप यांचीही अवस्था अशीच आहे.शेकाप आमदार विवेक पाटील यांची शिवसेना ही दुखरी नस आहे.उरण आणि पनवेल मत दार संघात श्रीरंग बारणे यांना मागच्या वेळेस गजानन बाबर यांच्यापेक्षा कमी मतं पडली तर शिवसेना त्याचं खापर शेकापवर फोडून आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचं उट्टं काढू शकते.हे शेकापला सोडा पण विवेक पाटलांना परवडणारे नाही.विवेक पाटील यांची मदार युतीच्या मतावर आहे.युतीची मतं जर उध्या कॉग्रसेकडं फिरली तर विवेक पाटलांना उरणची जागा राखणे कठिण जाणार आहे.त्यामुळं जयंत पाटील यांना काय वाटतंय याची पर्वा न करता विवेक पाटलांनी स्वतःसाठी वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे.अशी भूमिका विवेक पाटलांनी घेतली तर लक्ष्मण जगतापाचे अवघड नक्कीच अवघड होईल.यातून शेकापच्या वाट्यालाही काही येणार नाही.सारी शेकापच्या सरचिटणीसांची सारी गणितं उलटी-पुलटी होतील हे नक्की.शेकाप नेत्यांनी अगोदर आपच्या नेत्यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.तिथंलं जमत नाही म्हटल्यावर ते राज ठाकरेंकडं गेले.तिसऱ्या आघाडीच्या जयंत पाटलांच्या कल्पनेला राज ठाकरे यांनी सुरूंग लावला तरीही मावळ आणि रायगडातील शिवसेना उमेदवार पाडण्यासाठी त्यांनी जयंत पाटलांच्या हो मध्ये हो मिसळविला.पण त्यांचाही काही परिणाम होणार नाही हे जयंत पाटलांच्या नेरेस आल्यावर त्यांनी आपले परंपरागत शत्रू अ.र.अंतुले यांचे उंबरे झिजविले.त्याचाही उपयोग होत नाही म्हटल्यावर रायगडच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे सदादुःखी दत्ता खानविलकर यांना गाठले .दत्ता खानविलकरांनी  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाला विरोध केला होता.त्यामुळं रायगडात सरकारनं मंजूर करूनही स्मारक झालं नाही.परिणामतः  सारा दास संप्रदाय खानविलकरांवर  खवळलेला आहे.त्याच्याशी हात मिळवणी जो करील त्याला त्याचा  फटका बसू शकतो. हे लक्षात येताच  जयंत पाटील यांनी  खानविलकरांपासून अंतर ठेवले.मात्र परंपरागत शत्रू असलेल्या अंतुलेंशी युती,खानविलकरांशी हातमिळवणी,राज ठाकरेंशी बोलणी या गोष्टी रायगडातील शेकापच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्याही पचणी पडणाऱ्या नव्हत्या आणि नाहीत.शिवसेनेबरोबर युती असल्यानं पेण,उरणची जागा शेकापला मिळाली.जिल्हा परिषदेची सत्ताही मिळाली.ती युती तोडून जयंत पाटील काय साध्य करायला नि घाले आहेत?  याचं कोडं रायगडच्या शेकाप कार्यकर्त्यांना अजून सुटलेलं नाही.शिवसेनेबरोबरची युती जर तोडली तर शेकापला किमान जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीशी युती करावी लागेल.तशी युती झाली आणि अध्यक्षपद जयंत पाटील य़ांनी पदरात पाडून घेतलं तरीही विधानसभा आघाडीच्या विरोधातच लढवायची असल्यानं एकाकीपणे शेकाप एकही जागा जिंकू शकणार नाही.अगदी अलिबागची देखील.त्यामुळं अनेकांना असं वाटतंय,की लोकसभा निवडणुका झाल्या की,जयंत पाटील कृष्णकुंज ऐवजी मतोश्रीवर जातील आणि उध्दव ठाकरे यांना झालं गेलं विसरून जा आणि युती कायम ठेवा अशी विनवणी करतील .या वाटण्यात तथ्य आहे हे मान्य करावंच लागेल.कारण त्याशिवाय शेकापला गत्यंतर नाही.जयंत पाटील यांच्या हातात जेव्हापासून पक्ष आलाय तेव्हापासून त्यांना आघाडी केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.पूर्वी पक्ष स्वबळावर लढायचा आणि बऱ्याचदा जिंकायचाही.आज ती अवस्था राहिलेली नाही.त्यामुळंच विवेक पाटील अस्वस्थ आहेत.शिवसेनेची मदत मिळाली नाही तर पेणमध्ये धैर्यशील पाटीलही धोक्यात आहेत,हे वास्तव जयंत पाटलांना समजत नसेल असं समजणं चूक आहे.जयंत पाटलांना रत्नागिरी आणि मावळमध्ये पक्ष वाढवायचाय तर तेही होणार नाही.आयात केलेले उमेदवार मैदानात उतरवून पक्ष वाढेल अशी अपेक्षा करणं हा भ्रम ठरू शकतो.पराभूत झाल्यानंतर रमेश कदम तरी पक्षात राहणार आहेत काय हा कळीचा मुद्दा आहे,जयंत पाटलांना दि.बा.पाटील,रामशेठ ठाकूर ,दत्ता पाटील या साऱ्या  जिल्हयातील नेत्याना सांभाळता आले नाही.ते पक्ष सोडून गेले अशा तेव्हा कदम किंवा जगताप पक्षात राहतील ,पक्ष वाढविण्यासाठी काम करतील हे गृहितक न पटणारं आहे.

– वरील सर्व विश्लेषणाचा सार काढायचा तर एक गोष्ट दिसते की,रत्नागिरीत नारायण राणेंची,रायगडात रामदास कदम,विवेक पाटील आणि अनंत गीतेंची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे.त्यामुळं हा चक्रव्युह हे नेते कसा भेदतात आणि रत्नागिरी,रायगड आणि मावळ या कोकणाशी निगडीत लोकसभा मत दार संघातील निवडणुका राजकीयदृष्टया कोणाची वाट लावतात आणि कोणाला हात देतात हे 16 मे नंतर पाहणे रंजक ठरणार आहे.

 एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here