कोल्हापूर – पनवेल येथील महिला पत्रकारावर झालेला हल्ला आणि पुण्यातील एका महिला पत्रकाराच्या घरावर समाजकंटंकांनी केलेला हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच कोल्हापूरमध्येही तीन पत्रकारांना धमकवले गेल्याचे प्रकारण समोर आल्याने राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कोल्हापूर येथील पल्स पॉलिसीचे प्रकरण सध्या गाजते आहे.पल्स कंपनीने अनेकांना गंडविल्याचे समोर येत आहे..याच संदर्भात कोल्हापूरच्या काही वर्तमानपत्रात 5 नोव्हेबर रोजी बातम्या आलेल्या होत्या.अनेकाच्या पॉलिसी बुडाल्याचे बातम्यात म्हटले होते.बातम्या आल्यानंतर लोकांनी कंपनीच्या कार्याल्यात गर्दी केलीआणि आपले पैसे परत मागायला सुरूवात केली.त्यामुळे संतापलेल्या एजंटानी पत्रकारांना धमक्या दिल्या आहेत.तुम्ही बातमी का दिली,तुम्हा पत्रकारांना आम्ही बघून घेऊ अशा धमक्या देत अश्लिल शिवीगाळ केली आहे.या संबंधीची रितसर तक्रार पुण्यनगरीचे पत्रकार सुखदेव श्यामराव गिरी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली असून तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.अन्य ज्या तीन पत्रकारांना धमक्या दिल्या गेल्या आहेत त्यामध्ये बाळासाहेब मारोती पाटोळे,शशी बिडकर,आणि अमोल माळी यांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिसांनी कलम 504,506,्र4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलिस चौकशी करीत आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला असून जनहिताची भूमिका घेणा़ऱ्या पत्रकारांना धमकविणाऱ्या एजन्टांना तातडीने अटक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.पत्रकारांना कायदेशीर संरक्षण नसल्याने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पत्रकारावरील हल्ल्याच्या घटना सातत्यानं वाढत असून सरकारने तातडीने पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे.समितीचे शिष्टमंडळ लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन कऱण्याची भूमिका समितीने घेतली आहे.
महाराष्ट्रात गेल्या दहा महिन्यात 51 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.