कोण म्हणतो, पत्रकारांची एकजूट होत नाही ?

0
1015

पत्रकारांची एकजूट होऊ शकत नाही,

राजकारणी आणि हितसंबंधियांनी जोपासलेला गोडगैरसमज.
या गैरसमजाचे तेरा वाजविण्याचं काम तेरा जुलै रोजी राज्यातील पत्रकारांनी करून दाखविलं.
राजकारण्यांना धास्ती वाटावी अशी एकजूट दाखविली.
घंटानाद कुठं घुमला नाही. ?
सावंतवाडीत घुमला,महाडला घुमला,कोल्हापूरात घुमला,
आटपाडीत घुमला,काटोलात झाला,खामगाव-बुलढाण्यातही घंटा वाजत राहिली.
माझ्या गावात वडवणीत घंटानाद झाला,माजलगावला झाला,सातार्‍यात आणि नासिकात झाला,
जळगावला घंटा वाजली,नागपूर,चंद्रपूर आणि वर्ध्यातही घंटानाद झाला.
किनवट,औस्यात आणि परभणी-सेलूतही घंटानाद झाला.
अकोटला झाला,आष्टीत झाला,चाळीसगावातही घंटा वाजली.
मुंबई-पुण्यात तर घंटा घुमणारच होती.
थोडक्यात उभा-आडवा महाराष्ट्र काल घंटानादानं दणाणून गेला.
सारं कसं एकजुटीनं घडलं.
शिस्तीत घडलं.
ज्यांना ‘रस्त्यावर येणं आपलं काम नाही’ असं वाटतं होत.
असे व्हाईट कॉलर पत्रकारही रस्त्यावर आले होते .
मुठी आवळून झिंदाबाद म्हनताना दिसले होते .
कुणीच कुणाला विचारलं नाही,बाबा रे तु कोणत्या संघटनेचा?
कुणीच कुणाला विचारलं नाही, बाबा रे तु कोणत्या पेपरचा
‘आम्ही पत्रकार आहोत’ हीच ओळख होती,तीच सार्‍यांची भावना होती
मागणीही एकच होती,’कायदा झाला पाहिजे’, We Want Press Protection Act
हे सारं पाहून
कायद्याला विरोध कऱणारे चिमूटभर पत्रकार मित्रंही थक्क झाले,
हे घडलंच कसं? म्हनत डोकं खाजवू लागले .
घंटानादानं सरकारलाही भानावर आणलं.
पंधरा हजारांवर एसएमएस गेल्यानं केवळ मोबाईलच नव्हे तर सरकारचं टाळकंही जॅम झालं
दिवसभर दणाणणार्‍या घंटानादानं,
दिवसभर कोसळणार्‍या एसएमएसनं
‘कायदा झाला पाहिजे’ म्हणायला विरोधकांना मजबूर केलं.
‘कायद्यासाठी ‘ सकारात्मक आहोत’ म्हणायला मुख्यमंत्र्यांना भाग पाडलं.
कुणी म्हणाले,लक्ष्यवेधी आणतो,
कुणी म्हणाले,प्रायव्हेट बिल आणतो,
अनेकजण म्हणाले ‘हम आपके साथ है’
हे सारं आपल्या एकजुटीमुळं घडत होते .
काही नकारेश्‍वर म्हणाले,”खरोखऱच सरकार कायदा करेल”?
मी म्हणालो,सरकारचा बाप करेल,
कारण आमच्या एकीची ताकद त्यांना आता कळली आहे.
आम्ही संतापलोत आहोत हे ही त्यांना आता उमगले आहे .
तेह्वा कायदा तर होणारच आहे,
पण खरं सांगू मी कश्यामुळं खूष आहे,?
आपण एक झालोत,राग-लोभ,भेदा-भेद,हेवे-दावे सारं विसरून एक झालोत
हेच मोठे यश आहे.
चळवळ पुढं नेण्यासाठी हेच भांडवल असतं.
हे एकीचं धन आता आपल्याजवळ आहे.
आपण लढत राहणार आहोत,
जिंकेपर्यंत लढणार आहोत.
मागण्याच काय ? आज नाही तर उद्या मान्य होणारच आहेत,
पण आपण मोठी लढाई जिंकलीय,एकीची.
‘पत्रकारच पत्रकारांचा शत्रू असतो’ ही भावना मोडून काढलीय.
इकंडं घंटाही वाजत होत्या आणि तिकडं आजारी
अभय देशमुखच्या मदतीसाठीही शेकडो हातही पुढं येत होते.
हा बदल हेच आपल्या चळवळीचं यश आहे.
या यशाचे धनी अर्थातच आपण सारे आहात.
त्याबद्दल आपले आभार मानलेलं आपल्याला आवडेल?

एस एम देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here