महाराष्ट्रात सत्तेत राहिलेल्या कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कोकणात टोकाचं शत्रूत्व होतं.दोन्ही पक्ष उठसुठ परस्परांना संपविण्याचीच भाषा करायचे..तथाकथित जातीयवादी आणि धर्मान्ध पक्ष आपले शत्रू आहेत की आपणच आपले शत्रू आहोत याचंही विस्मऱण दोन्ही कॉग्रेसला झालं होतं. यातून दोन्हीकडून आत्मनाशाचं राजकारण खेळलं जायचं.राडे केले जायचे. रक्त सांडायचं. माणसांची फोडाफोड व्हायची. भा ज प -सेना नाही तर आपणच एकमेकांचे शत्रू आहोत असं या दोन्ही पक्षांचं वागणं आणि कृती होती. त्यातून समोरच्याला संपविण्याच्या आणाभाका घेतल्या जायच्या. िऊधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपले शब्द सत्यात उतरविल्याचं दिसून आलं. दोन कॉग्रेसच्या या भांडणात दोन्ही पक्षाचा समान शत्रू असलेली सेना अधिक मजबूत,अभेद्य झाली.दोन्ही कॉग्रेस तोंडघशी पडल्या..स्वतःला कोकणचे अनभिषिक्त सम्राट समजणारे नारायण राणे हे स्वतः तर पराभूत झालेच आहेत त्याच बरोबर त्यांची कोकणातील सद्दी देखील संपली आहे.खरं तर लोकसभा निवडणुकांनी नारायण राणे आणि एकूणच कॉग्रेसला सावध केलं होतं.आत्मचिंतन कऱण्याची संधी देखील दिली होती.मात्र एका पराभवानं बोध घेण्याची सवय नारायण राणे किंवा कॉग्रेसला नसल्यानं सारेच नेते बिनधास्त राहिले.पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कोकणाकडं दुर्लक्षचं केलं.राहूल गांधीची महाडची सभा सोडली तर कॉग्रेसचा एकही नेता कोकणाकडं फिरकलाच नाही.तळ कोकणात नारायण राणेंना एकहाती प्रचार करावा लागला.प्रचार करतानाही नारायण राणे एकाकीच पडले होते.शिवसेनेतून त्यांच्याबरोबर आलेल्या नेत्याचं पुनर्वसन होऊ न शकल्यानं हे सारे नेते एक एक करीत स्वगृही किंवा निवारा मिळेत ति थं निघून गेले होते.या नेत्यांच्या जिवावर राणे आपला मतु दार संघ सोडून महाराष्ट्र भर फिरायचे.यावेळेस तशी स्थिती नव्हती.त्यांना आपल्या आणि र्निींेशच्या मत दार संघात बराच वेळ द्यावा लागला.त्यानंतरही हाती काहीच लागले नाही याचा अथ र् मतदारांनी भाकरी फिरवायचीच असा निश्चय केला होता असेच दिसते.राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले राणे पराभूत झाले.राणे पितापुत्रांची अरेरावीच या अपयशाला काऱणीभूत आहे.कोकणात अनेकांवर राणेंनी अश्रूपात कऱण्याची वेळ आणल्यानेच नि तेश राणे आपल्या वडिलांची खाद्यावर डोकं ठेऊन रडताना पाहिल्यानंतरही कोणाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली नाही.एककल्ली राजकारणाची अ खेर अशाच पध्दतीनं झाल्याची शकडो उदाहरणं समोर असतानाही हे नेते धडा घेत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.नितेश राणे यांचा विजय ही अखेरची संधी समजून राणे पिता-पूत्रांनी आपलं वागणं-बोलणं बदलंलं नाही तर सिंधुदुर्गात ते अस्तित्वहीन होऊ शकतात हे नक्की. कारण कोकणातील पंधरा जागांपैकी बहुतेक ठिकाणी कॉग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला आहे.पक्ष तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.मतांच्या टक्केवारीतही कॉग्रेसचं हेच स्थान दिसून येतंय. कधी काळी कोकणावर प्रभाव असलेला हा पक्ष आपल्या कर्मदरिर्दीपणामुळं आता कोकणातून हद्पार व्हायच्या पातळीवर पोहोचला आहे.कॉग्रेसवर निष्ठा असणाऱ्यांसाठी ही वेदणादायक वस्तुस्थिती आहे.खरं तर कॉग्रेसची झालेली ही अवस्था एरवी राष्ट्रवादीसाठी आनंदाची वार्ता ठरली असती पण राष्ट्रवादीची अवस्था देखील टाळ्या वाजवाव्यात अशी नाही.राष्ट्रवादीच्या वाट्याला कोकणातील गुहागर,दापोली श्रीवर्धन आणि कर्जत या चार जागा आल्या असल्यातरी हे विजय कोकणातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना नि खळ आनंद देणारे नक्कीच नाहीत.रायगड हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा जिल्हा.या जिल्हयातील श्रीवर्धनमध्ये त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांचा केवळ 77 मतांनी विजय झाला आहे.अवधूत तटकरेंनी ” राज्यात सर्वात कमी मतांनी विजयी होणारे उमेदवार” असा लौकिक त्यानिमित्तानं मिळविला आहे. या विजयाचं श्रेयही राष्ट्रवादीला देण्याऐवजी शिवसेनेच्या बंडखोरास द्यावं लागेल. कारण सेना सोडून भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या या बंडखोरानं तब्ब्ल अकरा हजार मतं घेतली आहेत.म्हणजे अवधूत तटकरेंचा विजय सेनेतील बंडखोरीचा विजय आहे.जी स्थिती श्रीवर्धनची तीच स्थिती कर्जतची किंवा दापोलीची .कर्जतमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली नसती तर सुरेश लाड यांचा मोठ्या फरकानं पराभव होणं अटळ होतं.दापोलीतही अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या बंडखोेरास 19 हजाराच्यावर मतं पडली आहेत आणि सूर्यकांत दळवी दोन हजाराच्या आसपास मतांनी पराभूत झाले आहेत हे विसरता येणार नाही . गुहागरचा भास्कर जाधव यांचा विजय मात्र नि खळ आणि निर्विवाद असाच आहे यात शंका नाही.सेना आणि भाजप उमेदवारांची मतं एकत्र केल्यानंतरही भास्कर जाधव यांची मतं अधिकच होतात.म्हणजे चार विजयांपैकी तीन विजय हे तांत्रिक आहेत. विजय तो विजय असतो हे सूत्र मान्य केलं तरी पक्षाचा अन्य मत दार संघात जो दारूण पराभव झाला त्याचं काय? हा प्रश्न शिल्लक राहतोच.रायगडचा विचार करायचा तर अलिबाग मत दार संघात लोकसभेला राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना जवळपास 68 हजार मतं पडली होती.आता याच मत दार संघात पक्षाचे उमेदवार महेश मोहित 3500 मतं मिळवून अनामत गमावून बसले आहेत.पेणमध्ये 2009मध्ये ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास 29 हजार मतं मिळाली होती ति थं आता संजय जांभळे याना जेमतेम 11 हजार मत ंमिळाली आहेत.महाड,उरण आणि पनवेलमध्येही पक्ष आपली अनामत टिकवू शकलेला नाही. या मत दार संघातील पक्षाची मतं गेली कुठं ? ती शेकापकडं वळविली गेली की,या मत दार संघात पक्ष अस्तित्वच हरवून बसला आहे? याचा खुलासा सुनील तटकरे यांनी कऱण्याची गरज आहे.तळ कोकणातही अशीच स्थिती.राजापूर असेल,कुडाळ असेल,किंवा कणकवली असेल नाहीतर सावंतवाडी या सर्वच ठिकाणी पक्षाला मिळालेली मतं पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाची नक्कीच लाज काढणारी आहेत. कोकणातील कॉग्रेसच्या आणि विशेषत्वानं नारायण राणे यांच्या कुटुंबाची अरेरावी आणि पक्षाचा निष्काळजीपणा कॉग्रेसच्या वाताहातीला जसा कारणीभूत आहे तसाच राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आपसातील वाद आणि संधीसाधू किंवा नेत्याचं आत्मकेंर्दी राजकारणाचा ही हा परिपाक आहे.रायगडात राष्ट्रवादीनं शेकापच्या गळ्यात गळे घालण्याचा जो अनैसिर्गिक प्रय़त्न केला तो राष्ट्रवादीच्या अंगलट आला.वस्तुतः – लोकसभेच्या वेळेस कॉग्रेसचे नेते माणिक जगताप असतील,मधू ठाकूर असतील रवी पाटील किंवा महेंद्र धरत,श्याम म्हात्रे असतील या सर्वांनी आघाडी धर्म निभावत सुनील तटकरे यांना प्रामाणिकपणे मदत केली. निवडणुका होताच तटकरेंना याचा विसर पडला दिसतोय. जिल्हा परिषद राजकारणाचे निमित्त करून तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील एकत्र आले आणि दोन्ही नेत्यांनी एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या अनुक्रमे कॉग्रेस आणि शिवसेनेला संपविण्याचा प्रय़त्न सुरू केला. या प्रयत्नात तटकरे आणि जयंत पाटीलच हात पोळून बसले.शेकापनं शिवसेनेबरोबर काडीमोड घेतला नसता आणि आघाडी मोडल्यानंतरही राष्ट्रवादीनं जिल्हयापुरती आघाडी कायम ठेवली असती तर राष्ट्रवादी आणि शेकाप हे दोन्ही पक्ष आज आनंदोत्सव साजरा करताना दिसले असते. तसं न करता केवळं अहंकारामुळं शेकापनं शिवसेनेची साथ सोडली.त्याचा पश्चाताप करण्याची वेळ आता शेकापवर आली.शेकापला जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेबरोबर राहूनही मिळणारच होती. त्यामुळं तो लाभ नाही.उलट लोकसभेला डिपॉझिट घालवून पक्षानं हसं करून घेतलं आणि आता उरणवर पाणी सोडून युती तोडल्याची मोठी राजकीय किंमत मोजली.त्याच बरोबर शेकापची विश्वासार्हताही रसातळाला पोहोचली. – शेकापचा सेनेबरोबर घटस्फोट झालेला दिसताच सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील आपल्याबद्दल काय काय बोलले हे विसरून जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी शेकापबरोबर नवा घरोबा करणे पक्षाला महागात पडल .तटकरेंच्या या राजकारणामुळं जे शेकापमधून राष्ट्रवादीत आले होते त्याचं राजकारणच धोक्यात आलं. मकेंद्र दळवी ,राजीव साबळे यांची नाराजीही त्यातूनच नि र्माण झाली.जिल्हयातील राष्ट्रवादीमध्ये या नि र्णय़ानं मोठा असंतोष नि र्माण झाला.परिणामतः मोठा जनाधार असलेले महेंद्र दळवी पक्ष सोडून गेले.महेंद्र दळवी यानी अलिबागेतून शिवसेनेकडून निवडणूक लढवत 60 हजारावर मतं मिळविलीत.त्यांना थोडा वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे दिसले असते.सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या तडजोडीच्या राजकाराला मतदारांकडून मिळालेली ही चपराक आहे हे नक्की.रायगडात च र्चा अशी आहे की,जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी विधानसभेसाठी परस्परांना मदत केली आहे. मतांवर नज र टाकली तर दिसतंही तसेच आहे. या दोघांचं हे सोयीचं राजकारण मतदारांपासून लपून राहिलं नाही.पक्षा पेक्षा हे दोन्ही नेते स्वहिताला प्राधान्य देतात हे वास्तवही मतदारांच्या लक्षात आलं आणि या दोघाही नेत्यांना मतदारांनी धडा शिकविला.लोकसभेच्या वेळेस शिवसेनेबरोबरची युती तोडून स्वतःाचे उमेदवार उभे करण्याची शेकापची खेळी अपेक्षेप्रमाणे विवेक पाटील यांच्या मुळावर आली.2009मध्ये 15 हजारांवर मतांनी निवडून आलेले विवेक पाटील यावेळेस चक्क पराभूत झाले.शेकापच्या आत्मघातकी राजकारणाचा विवेक पाटील हे बळी ठरले.पेणमध्येही धैर्यशील पाटलांचे अक्षरशः – बोटावर निभावले आहे.2009मध्ये रायगडमध्ये शेकापच्या तीन जागा निवडून आल्या होत्या.चुकीच्या राजकारणामुळे त्यातली एक जागा या पक्षाला गमवावी लागली.मतांच्या टक्केवारीत 15.90 टक्के मिळवून हा पक्ष दुसऱ्या स्थानावर असला तरी राष्ट्रवादीने शेकापची संगत केल्याने राष्ट्रवादी हा पक्ष टक्केवारीत रायगडमध्ये पाचव्या स्थानावर फेकला गेलाय.येत्या काही दिवसात रायगड राष्ट्रवादीमधील मोठा गट अन्य पक्षात गेलेला दिसेल. जिल्हयात च र्चा अशीही आहे की,शेकापमधील एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असून तो लवकरच सेना प्रवेशाची घोषणा करणार आहे.शेकाप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.नेत्यांनी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते निष्ठेनं पक्षाचं काम करीत असल्याचे अनेक वेळा दिसून आलंय.मात्र अलिकडं जयंत पाटील याच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे पक्षात मोठी अस्वस्थतः आहे.
– भाजप-सेनेचं काय
————————–
कोकणात शिवसेना 2009च्या तुलनेत तीन अधिक जागा जिंकून फायद्यात राहिली असली तरी विभागात सेनेला असलेली अनुकुलता लक्षात घेता सेना दहा जागा मिळवेल असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज होता.तो खोटा ठरला तो सेने नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे.श्रीवर्धमध्ये होणारी बंडखोरी टाळता येणं कठिण नव्हतं.पण कृष्णा कोंबनाक बंडखोरी करताहेत म्हटल्यावर त्यांना समजविण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही.त्यामुळ अवघ्या 77 मतांनी सेनेला श्रीवर्धनची हक्काची जागा घालवावी लागली.कर्जतमध्येही तिकीट देताना धरसोडवृत्तीच दिसून आली.अगोदर महेंद्र थोरवे यांना तिकीट जाहीर झालं होतं.ऐनवेळी ते बदलून हनुमंत पिंगळे यांना देण्यात आलं.या पिंगळे यांनी मागच्या वेळेस बंडखोरी करून सेनेच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चाखायला लावली होती.पिंगळेंना तिकीट दिले गेल्याने थोरवे शेकापच्या तिकीटावर उभे राहिले.सेनेच्या अन्य नेत्यांनी तटस्थ राहणेच पसंत केले.त्याचा फटका पिंगळे यांना बसला.थोरवे यांना 55 हजार मतं मिळाली आहेत.एवढी मतं शेकापला या मत दार संघात कधीच मिळाली नव्हती.यातील बहुताःश मतं शिवसेनेची आहेत.उध्दव ठाकरे यांनी कर्जतला सभा घेतल्यानंतरही त्यांना स्थानिक नेत्याची नाराजी दूर करता आली नाही.त्यामुळं या दोन्ही जागा सेनेने हातानी घालविल्या असं म्हणता येईल.दापोलीच्या बाबतीतही सेना नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडला.सूर्यकांत दळवी येणारच आहेत अशीच हवा होती.मात्र तेथेही बंडोबांनी घात केला आणि दळवींचा निसटत्या मतांनी पराभव झाला.म्हणजे या तीन मत दार संघाकंडं थोडं लक्ष दिलं असतं तर सेनेला कोकणात दहा जागा जिंकणं कठिण नव्हतं.शिवसेनेच्या हातून निसटलेल्या या तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या नसत्या तर राष्ट्रवादी कोकणात पार भुईसपाट झाली असती. त्यामुळं य़ापुढं तरी कोकणात बंडखोरांना आवरणं पक्षासाठी आवश्यक झालेलं आहे पक्ष नेतृत्वाला त्या अंगानं भविष्यात विचार करावाच लागणार आहे.
एवढी बंडखोरी झाल्यानंतरही सेनेला कोकणात जे मिळालं तेही काही कमी नाही. कोकणात सेना नंबर एकवर आहे.नारायण राणेंची कुडाळची जागा चांगल्या फरकानं वैभव नाईक यांनी जिंकून देत उध्दव ठाकरे यांचं जुनं स्वप्न नाईकांनी पूर्ण केलंय. रत्नागिरीत उदय सामंत यांचा विजयही नक्की समजला जात होता.रवींद्र सावंत यांनी रत्नागिरीत भाजपच्या बाळ माने यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे.नारायण राणे एवढाच सर्वाना धक्का देणारा निकाल उरणचा ठरला.उरणमध्ये विवेक पाटील याचं काम चांगलं आहे.पक्ष बांधणीही त्यांनी चागली केलेली असली तरी शेकापनं शिवसेनेशी जो पंगा घेतला आहे त्याचा फटका विवेक पाटील यांना बसला आहे.शिवसेना आणि शेकाप एकत्र असते तर उरण आणि पनवेलची जागाही शेकापला जिंकता आली असती.शेकापच्या संधीसाधू राजकारणामुळे .एका महत्वाच्या नेत्याचा पराभव शेकापला पचवावा लागला आहे.या पराभवानंतर आता विवेक पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.कारण उरण असेल किवा पनवेल हे शेकापचे बालेकिल्ले आहेत.इथंही पक्षाचा पराभव होत असेल तर पक्षाला साऱ्या गोष्टींचा नक्कीच पुनर्विचार करावा लागणार आहे.
– भाजपला कोकणात एकच जागा होती,प्रमोद जठार यांची कणकवलीची.ती पक्षानं गमविली असली तरी कोकणचं प्रवेशव्दार असलेल्या पनवेलची जागा प्रशांत ठाकूर यांच्या रूपानं पक्षाला मिळाली आहे.म्हणजे भाजपचं गणित ना नफा ना तोटा या पध्दतीनं सुटलं.कोकणात भाजप उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभा झाल्या.मात्र कोकणात मोदी इफेक्ट कुठेच जाणवला नाही.कोकणात बहुतेक ठिकाणी भाजप चौथ्या-पाचव्या स्थानावर राहिला.रायगडमध्ये भाजपला 10.15 टक्के मतं मिळाली.अनेक ठिकाणी या पक्षाच्या उमेदवाराची अनामत जप्त झाली.त्यामुळं कोकणावर स्वारी भाजपसाठी वाटते तेवढी सोपी नाही.तरीही पक्षाचे जे परंपरागत गड आहेत अशा ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून पक्षाला प्रयत्न करता येऊ शकतात.एक मात्र खरं की,प्रस्थापितांना धक्का देणारे आणि सर्वच राजकीय पक्षांना आत्मपरिक्षण करायला लावणारे हे निकाल आहेत.
एस.एम.देशमुख