कोकणवासीयांसाठी खुशखबर

0
837

मुंबई-गोवा महा मार्ग
मुख्य अडथळा दूर झाला..स्वागत आहे..

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण व्हावे यामागणीसाठी कोकणातील पत्रकार गेली सहा वषे सनदशीर मागार्ने आंदोलन करीत आहेत.त्या मागणीसाठीच येत्या १६ जून रोजी वडखळ ते पेण असा लाॅंगमार्च काढण्याचा निणर्य रायगडमधील पत्रकारांनी घेतला आहे.
मुंबई-गोवा महमागार्च्या पहिल्या टप्प्याचं काम मध्यंतरी सुरू झालं.आता ते बंद पडलं आहे.त्यामुळं अपघात वाढले आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.हे काम का बंद पडले त्याची वेगळी कारणं असली तरी कनार्ळा अभयारण्यातून रस्ता करायला परवानगी मिळत नाही ,आणि भूसंपादनास अडथळा येत अाहे असे सीगितले जाते ते खरं नाही . तरी ही आता कनार्ळाचा अडथळा दूर होत असल्याची आनंदाची बातमी आहे.काही अटींवर कनार्ळा अभयाऱण्यातून रस्ता करण्यास पयार्वरण मंत्रालयानं परवानगी दिल्याची ही बातमी आहे.प्रकाश जावडेकर यांनी या बाबत सकारात्मक भूमिका घेतली त्याबद्दल कोकणातील पत्रकारांच्यावतीनं मी जावडेकर यांना धन्यवाद देत आहे.मुळ बातमी खाली दिली आहे.–
———————————————————————————————————-
कर्नाळाअभयारण्याच्या मध्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणार्‍या वन्यजमिनीएवढेच अभयारण्यक्षेत्र वाढविण्याची प्रमुख अट.
वाहनांच्या वेगालाही ब्रेक लावताना ३० किमीपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवू नयेत, असाही दंडक घालण्यात आला आहे.
नवी दिल्ली, दि. २ (विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारने कोकणवासीयांसाठी एक खूशखबर दिली आहे. बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मार्गातील अडथळा ठरलेला कर्नाळा अभयारण्याचा मुद्दा निकाली निघाला असून आता रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या थेट पोटातून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने आजच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणातील जलद वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार असून कोकणच्या विकासाबरोबरच रेल्वे वाहतुकीवरचा ताणही यामुळे कमी होणार आहे.
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कर्नाळा अभयारण्याच्या पोटातूनच हा चौपदरी महामार्ग जावा या प्रस्तावास याच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २००९ आणि २०१३ मध्ये परवानगी नाकारली होती.
केंद्रीय वने आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयास दुजोरा दिला आहे. या निर्णयाने मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावरील पनवेल ते सिंधुदुर्गमधील झारापदरम्यानच्या पट्ट्याच्या कामाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ४५५ किलोमीटरच्या या टप्प्यासाठी चार हजार कोटी रुपये लागणार आहेत. प्रस्तावित मार्ग हा कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे त्याचे चौपदरीकरण करण्याची परवानगी पर्यावरणाच्या निकषावर दोनदा नाकारण्यात आली आहे. या चौपदरीकरणासाठी इको सेन्सिटिव्ह झोनपैकी १.६५ हेक्टर वन जमीन द्यावी लागणार आहे. यापूर्वी अभयारण्याच्या सीमेवरून मार्ग काढण्याचा प्रस्ताव वन्यजीव मंडळाच्या विचाराधीन होता व तसा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रस्ताव वाढीव खर्चामुळे नाकारला होता. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदीकरणात मोठे अडथळे उभे राहिले होते. अभयारण्याच्या मध्यातून महामार्ग काढण्याचाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे फेरप्रस्ताव पाठवला होता. त्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले, मात्र त्यासाठी विविध अटीही घालण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here