मुंबईतील एक कथित महिला पत्रकार एसेम आणि किरण नाईक यांना बदनाम कऱण्यासाठी त्यांच्या विरोधात काही मटेरियल मिळते का याचा शोध जिल्हयाजिल्हयात फोन करून घेत असल्याची” बातमी आज बेरक्यानं पोस्ट केली आहे.ही बातमी वाचून धक्का बसला,निराशही झालो.मात्र दिवसभर राज्यभरातून अक्षऱशः शेकडो हितचिंतक पत्रकार मित्रांनी फोन करून अथवा व्हॉटस् अॅपवरून ” चिंता करू नका आम्ही आपल्यासोबत असल्याचा” दिलासा दिला.त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो.बेरक्यानंही खंबीरपणे पाठिशी उभं राहायचं आश्वासन दिलं त्याबद्दल बेरक्याचेंही आभार.
पत्रकारांच्या हक्काची लढाई मी लढतो आहे.त्यासाठी 19 वर्षाच्या नोकरीवर आणि एक लाख रूपयांच्या पगारावर मी पाणी सोडले आणि त्यानंतर नोकरीसाठी कुठेही प्रयत्न केले नाहीत.सुदैवानं माझ्या घरची परिस्थिती बरी असल्यानं चळवळीसाठी जो खर्च लागतो तो सारा मी माझ्या खिश्यातून करतो आहे..त्यामुळे कोणी कितीही जासुसी केली तरी हाती काही लागणार नाही.परंतू बदनाम करण्यासाठी जो मार्ग अवलंबिला जात आहे ते पाहून नैराश्य तर नक्कीच येते.मात्र आपण सारे माझ्या पाठिशी असल्याचा मोठा दिलासा दिवसभरात मिळाल्यानं नैराश्य झटकून मी पुर्वीच्याच जिद्दीनं काम करीत राहणार आहे.अन अशा कोणत्याही षडयंत्रांना भिक घालणार नाही.एक तर मलाही कळते की,ज्यांचे हितसंबंध माझ्यामुळं धोक्यात आलेले आहेत अशी मंडळी माझ्याविरोधात कारस्थानं ही करीत राहणारच.अशा सर्व कारस्थानांना तोंड देण्याची माझी तयारी आहे.कारण कारस्थानं करणारी मंडळी काचेच्या घरात राहणारी आहे आणि माझ्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. शिवाय मला काही मिळवायचं नाही आणि गमविण्यासारखं माझ्याजवळ आता काही नाही.एक नोकरी होती ती केव्हाच गमवून बसलो आहे.त्यामुळं मला भय नाही. आयुष्यात असे अनेक धक्के पचविले असल्यानं मी मनानं खंबीर आणि निर्भय झालेलो आहे.शिवाय हाती घेतलेले काम अर्धवट सोडून पळून जाण्याचा माझा स्वभाव नाही.अडचणी तर असंख्य आहेत तरीही माझी लढाई विजयी होईपर्यंत निर्धारानं मी लढत राहणार आहे.त्यात कोणी कितीही व्यत्यय आणला तरी मी त्याला भिक घाळणार नाही.
राहिला प्रश्न माझ्यावरील गुन्हयांचा.चळवळी करणारांसाठी दाखल झालेले गुन्हे ही आभूषणं असतात.जनहिताचे लढे लढताना,संघटना चालवताना माझ्यावर किती आणि कोठे कोठे गुन्हे दाखल झालेत याची जर माहिती कुणाला हवी असेल तर त्यांनी ती मला विचारावी ना,, त्यासाठी जासुसी करून आपला वेळ वाया घालविण्याची काहीच गरज नाही.मी सारी माहिती द्यायला तयार आहे.धन्यवाद.
आपल्या सर्वांचा
एसेम
“मुंबईतील एक कथित महिला पत्रकार एसेम आणि किरण नाईक यांना बदनाम कऱण्यासाठी त्यांच्या विरोधात काही मटेरियल मिळते का याचा शोध जिल्हया जिल्हयात फोन करून घेत असल्याची” बातमी आज बेरक्यानं पोस्ट केली आहे.ही बातमी वाचून धक्का बसला,निराशही झालो.मात्र दिवसभर राज्यभरातून अक्षऱशः शेकडो हितचिंतक पत्रकार मित्रांनी फोन करून अथवा व्हॉटस् अॅपवरून ” चिंता करू नका आम्ही आपल्यासोबत असल्याचा” दिलासा दिला.त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
पत्रकारांच्या हक्काची लढाई मी लढतो आहे.त्यासाठी 19 वर्षाच्या नोकरीवर आणि एक लाख रूपयांच्या पगारावर मी पाणी सोडले आणि त्यानंतर नोकरीसाठी कुठेही प्रयत्न केले नाहीत.सुदैवानं माझ्या घरची परिस्थिती बरी असल्यानं चळवळीसाठी जो खर्च लागतो तो सारा मी माझ्या खिश्यातून करतो आहे. चळवळीसाठी एसेम यानी दहा रूपये मागितल्याचे जरी उभ्या महाराष्ट्रात कोणी म्हटले तरी मी सारं सोडून गावाकडं जाऊन बसायची तयार आहे.त्यामुळे कोणी कितीही जासुसी केली तरी हाती काही लागणार नाही.परंतू बदनाम करण्यासाठी जो मार्ग अवलंबिला जात आहे ते पाहून नैराश्य तर नक्कीच येते.मात्र आपण सारे माझ्या पाठिशी असल्याचा मोठा दिलासा दिवसभरात मिळाल्यानं नैराश्य झटकून मी पुर्वीच्याच जिद्दीनं काम करीत राहणार आहे.अन अशा कोणत्याही षडयंत्रांना भिक घालणार नाही.एक तर मलाही कळते की,ज्यांचे हितसंबंध माझ्यामुळं धोक्यात आलेले आहेत अशी मंडळी माझ्याविरोधात कारस्थानं ही करीत राहणारच.अशा सर्व कारस्थानांना तोंड देण्याची माझी तयारी आहे.कारण कारस्थानं करणारी मंडळी काचेच्या घरात राहणारी आहे आणि माझ्या घराच्या भिंती मातीच्या आहेत त्यामुळं मला भय नाही. आयुष्यात असे अनेक धक्के पचविले असल्यानं मी मनानं खंबीर आणि निर्भय झालेलो आहे.शिवाय हाती घेतलेले काम अर्धवट सोडून पळून जाण्याचा माझा स्वभाव नसल्यानंच रायगडमध्ये ‘एस.एम. म्हणजेच सक्सेसफुल मॅन’ असं मला म्हटलं जायचं.अनेक अडचणी असल्या तरी तीच हिमंत आजही माझ्यात आहेत.त्यामुळे मी कुणाला भिक घालणार नाही हे आमच्या जासुस भगिनीनं लक्षात ठेवावं.
राहिला प्रश्न माझ्यावरील गुन्हयांचा.चळवळी करणारांसाठी दाखल झालेले गुन्हे ही आभूषणं असतात.जनहिताचे लढे लढताना,संघटना चालवताना माझ्यावर किती आणि कोठे कोठे गुन्हे दाखल झालेत याची जर माहिती कुणाला हवी असेल तर त्यांनी ती मला विचारावी ना,, त्यासाठी जासुसी करून आपला वेळ वाया घालविण्याची काहीच गरज नाही.मी सारी माहिती द्यायला तयार आहे.धन्यवाद.
आपल्या सर्वांचा
एसेम