भोपाळ, ‘दैनिक ‘सामना’च्या प्रेमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पडले आहेत. मध्य प्रदेश भाजप ‘सामना’सारखेच वर्तमानपत्र सुरू करणार अशी घोषणा त्यांनी रविवारी केली. रविवारी रात्री चौहान यांनी भाजप पदाधिकारी, प्रवक्ते आणि भाजप अंगीकृत संस्थांच्या प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ‘सामना’ जसे ठोस विचारांवर आधारलेले वर्तमानपत्र आहे, तसेच वर्तमानपत्र पक्ष सुरू करेल असे सांगितले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि सरकारची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचण्यास मदत होईल. राज्यातील दहा लाख कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांना जोडण्याचे काम हे वर्तमानपत्र करेल, असेही चौहान म्हणाले..