उरणची रेल्वे रखडली

    0
    878

    लोकलमध्ये बसून मुंबईला जाण्याचे उरणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न नजिकच्या काळातही प्रत्यक्षात येण्याची शक्यता नसल्याने उरण परिसरातील जनतेत नाराजी व्यक्त होताना दिसते आहे.
    उरणला रेल्वे मार्गाने मुंबईशी जोडणारा सीवूड-उरण रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे आणि सिडकोने 1996मध्ये हाती घेतला .1803 कोटी रूपयांच्या या प्रकल्पात मध्य रेल्वेची एक तृतीयांश तर सिडकोचा भागिदारी दोन तृतीयांश होती. 22 किलो मिटर लांबीच्या या दुहेरी रेल्वेमार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले असते तर उरणच्या विकासाला वेग आला असता पण तीन किलो मिटर अंतराच्या वन विभागाच्या जमिनीचे अधिगृहन कऱण्यात वन कायद्यांमुळे अडथळे येत असल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे.जमिन संपादनासाठी मध्य रेल्वे सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असले तरी त्यात रेल्ेवला यश येताना दिसत नाही.त्यामुळे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच्या 18 वर्षात केवळ 40 टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे.सीवूड-उरण रेल्वेमार्गाछे काम कधी पूर्ण होईल आणि या मार्गावर कधी रेल्वे धावायला लागेल याबद्दल सारेच साशंक आहेत.
    22 किलो मीटरच्या या रेल्वे मार्गावर बेलापूर,सीवूड,किले,तारघर,बामणडोंगरी,गोरकोपरी,न्हावा-शेवा, द्रोणागिरी उरण अशी नऊ स्थानके प्रस्तावित असून त्यांची कामंही प्रगतीपथावर आहेत.या मार्गावर लोकल सुरू झाल्यानंतर उरणकरांसाठी मुंबई एक तासाच्या अंतरावर येणार आहे त्यामुळे येणारे अडथळे दूर करून रेल्वे मार्ग तातडीने सुरू करावा अशी जनतेची मागणी आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here