उद्योग मंत्र्यांचे आश्वासन

0
965

अलिबाग- रायगड जिल्हयातील तीन तालुक्यातील 57 गावे दिल्ली मुबई इन्डस्ट्रीयल कॉरिडोर प्रकल्पातून वगळल्यानंतरही शेतकऱ्यांच्या सातबारावरील प्रकल्पाच्या नोंदी अजून कायम आहेत.त्या पुसण्याची ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली आहे.
कॉरिडोर विरोधी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने देसाई यांची मंत्रालयात भेट घेतली.यावेळी समितीच्यावतीने कॉरिडोर प्रकल्प रद्द करावा,त्यातून वगळण्यात आलेल्या गावातील सातबारावरील शिक्के रद्द करावेत,विळे-भागाड एमआयडीसीच्या प्रकल्पग्रश्तांचे प्रश्न सोडवावेत आदि मागण्याचे निवेदन उद्योगमंत्र्यांना सादर करण्यात आले.
दिल्ली मुंबई कॉरिडोर प्रकल्पासाठी 78 गावातील जमिन संपादन कऱण्याचे नियोजन होते.स्थानिकांच्या विरोधामुळे 57 गावे प्रकल्पातून वगळून 21 गावात हा प्रकल्प कायम ठेवण्यात आला आङे.मात्र प्रकल्पातून वगळण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी अजून कायम आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here