कोणतंही वृत्तपत्र अथवा नियतकालिक सुरू करताना त्याची नोंदणी रजिस्टार ऑफ न्यूजपेपर दिल्ली यांच्याकडं करावी लागते.तसं न करणारं वृत्तपत्र हे बेकायदा केलेले कृत्य असतं आणि त्यासाठी योग्य ती शिक्षेची तरतूदही कायद्यात आहे.टीम अरविंद केजरीवालला याची माहिती तरी नसावी किंवा आपण कायद्याच्या वर आहोत अशा अहंकारात तरी ही मंडळी वागत असावी.म्ङणूनच् त्यानी आप की क्रांती नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलेलं आहे.
आप की क्रांती हे आम आदमी पार्टीचं मुखपत्र म्हणूनच काम करतंय.ंअंकात सारी माहिती आपचीच दिलेली असते आणि दिल्लीत आपच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत आप की क्रांतीच्या प्रती वाटल्या जातात.गुडगाव येथे नुकतीच आपचे योगेंद्र यादव यांची प्रचारसभा झाली.यावेळी देखील आप की क्रांतीच्या प्रती वाटल्या गेल्या.त्याला डिस्टी्रक्ट मिडिया सर्टिफिकेशन ऍन्ड मॉनिटरिंग कमिटीने आक्षेप घेत एकतर्फी मजकूर असलेल्या का्रंतीमधील बातम्यांना पेड न्यूजचाच हिस्सा मानत योगेंद्र यादव यांच्यावर कारवाई केली आहे.हे वृत्तपत्र छापने आणि वाटण्याचा खर्छ आता योगेंद्र यादव यांच्या खर्चात धरला जाणार आहे.एका प्रतीची किंमत तीन रूपये गृहित धरून 50 हजार प्रतीचे दीड लाख रूपये यादव याच्या खर्चात धरले जाणार आहेत.
नोंदणी नसलेले वृत्तपत्र चालविल्याबद्दलही यादव यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.प्रेस ऍन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट 1867 च्या कलम 15 अनुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.या कलमात आरोपीला 2000 रूपये दंड आणि सहा महिने शिक्षेची तरतूद आहे.
एमसीएमसीने योगे्रंद्र यादव यांना 7 एप्रिल रोजी पेड न्यूजची नोटीस दिली होती.त्याला यादव यांनी 9 तारखेला उत्तर पाठविले आहे त्यात यादव यांनी म्हटले आहे की,आप की क्रांती हे समाचार पत्र नाही तर एक पॉम्लेट आहे.पण त्यांचा तर्क समितीने अमान्य करीत त्यांच्यावर आचारसंहिता भांगाची कारवाई केली आहे.
इतरांना कायद्याची भाषा शिकविणारे आपचे नेते कायदा गुंडाळून टेवतात हे या निमित्तानं पुन्हा दिसून आलं आहे.